LPG Price Hike : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस दरवाढीचाही झटका बसला आहे. बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. याआधी 1 जुलैला सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. जानेवारीपासून सातत्याने सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत आहे. जानेवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत.
मागील काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता. एक ऑगस्टला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, विरोधकांचा रोष टाळण्यासाठी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या LPG सिलिंडरचा दर राजधानी दिल्लीतील 859.5 रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 834 रुपये इतकी होती. आर्थिक राजधानीमध्येही गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गॅसची किंमत 834.5 रुपये इतकी होती. आता यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस 859.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत 886 रुपये इतकी झाली आहे. याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर 861 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये 875.5 तर लखनऊमध्ये 897.5 रुपयांना 14 किलोचा गॅस मिळेल. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.