Manappuram Finance : एनबीएफसी सेक्टरमधील मणप्पुरम फायनान्सच्या शेअर्समध्ये (Manappuram Finance) सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. लाँग टर्ममध्ये त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
आता डिसेंबर तिमाहीचे कमकुवत निकाल असूनही, बाजारातील तज्ज्ञ मणप्पुरम फायनान्सच्या शेअर्समध्ये आणखी वाढीचा विश्वास व्यक्त करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 147 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 28 टक्के जास्त आहे. त्याचे शेअर्स आता 115.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत. (Manappuram Finance NBFCs share investment read story )
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 साठी मणप्पुरम फायनान्सचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट तिमाही आधारावर 4 टक्क्यांनी घसरून 390 कोटी रुपये झाले. नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये (NIM) घट आणि स्टँडअलोन गोल्ड फायनान्समधील हाय ऑपरेटींग एक्सपेंसमुळे त्याच्या नेट प्रॉफिटमध्येही घसरण झाली.
तरीही, देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या मते हाय ग्रोथ, एनआयएममधील सुधारणा आणि आशीर्वाद मायक्रोफायनान्समधील क्रेडिट कॉस्टने त्याच्या कंसोलिडेटेड प्रॉफिटेबिलिटीला सपोर्ट दिला आहे. (Manappuram Finance NBFCs share investment read story)
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत त्याचा आरओई (RoE) 17.2 टक्के होता. ब्रोकरेज फर्मच्या मते, MFI (मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन) उद्योगात तेजी येण्याची अपेक्षा आहे आणि सतत चांगल्या व्यवसायामुळे त्याचे कंसालिडेटेड आरओई वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, ब्रोकरेज फर्मने 147 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे.
मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. पण सध्या हा शेअर मोठ्या सवलतीत मिळत आहे. त्याचे शेअर्स 10 फेब्रुवारी 2006 रोजी अवघ्या 64 पैशांना मिळत होते. पण आता हे शेअर्स 17931 टक्के मजबूत होऊन 115.40 रुपयांवर गेले आहेत. याचा अर्थ असा की त्या वेळी केवळ 56,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदार कोट्यधीश झालेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.