Marriage Loan File Photo
अर्थविश्व

लग्नासाठी कर्ज घेताना लक्षात ठेवायचे 4 मुख्य मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

Marriage Loan top 4 things to keep in mind

भारतात लग्न आणि लग्नाशी संबंधित सोहळे आठवडाभर तरी चालतात. याचा अर्थ अनेक कार्य-समारंभ आणि त्यासाठी कपडे, लग्नापूर्वी करायचे सौंदर्य-उपचार आणि महागड्या भेटवस्तूंबद्दल तर बोलायलाच नको, यासोबतच कार्यस्थळ, जेवण आणि सजावट यासाठी पैसे खर्च करावे लागतात.

तुम्हाला तुमच्याच गावात भव्य लग्नसमारंभाचा आनंद घ्यायचा असो वा डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनोख्या ठिकाणी जायचे असो, तुमच्या स्वप्नातील लग्नासाठी खर्च करण्यास तुम्हाला योग्य आर्थिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तुमच्या लग्नासाठी तुम्ही वेगळे पैसे बाजूला काढून ठेवले असतील तर ठीक नाहीतर लग्नासाठी लोन घेणे उत्तम. हे पर्सनल लोन आहे ज्याचा वापर तुम्ही लग्नासंबंधीचे सारे खर्च करण्यासाठी करु शकता.

लग्नासाठी लोन घेताना लक्षात ठेवायचे 4 मुख्य मुद्दे:

1. लग्नासाठी लोन घ्यावयाचे पात्रता निकष:

Personal loan for marriage (लग्नासाठी पर्सनल लोन) घेण्यास तुम्ही अर्ज करता तेव्हा कर्ज देणारे ज्या घटकांचा विचार करतात ते पुढीलप्रामणे आहेत:

वय आणि रोजगार स्थिती: उमेदवाराचे वय 25 वर्षे व अधिक आणि स्थिर नोकरी असलेल्यांच्या लोन अर्जांना मंजुरी देण्यास वित्त संस्था प्राधान्य देतात. स्टार्ट-अप, एमएसएमई युनिट्स आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांपेक्षा एमएनसीमध्ये काम करणार्‍या लोकांना प्राधान्य दिले जाते.

मासिक उत्पन्न: तुम्ही कर्जाची परतफेड करु शकाल की नाही हाच तुमचे मासिक उत्पन्न बघण्यामागील हेतू कर्ज देणार्‍याचा असतो. लग्नासाठी लोन असो की प्रवासासाठी, प्रत्येक महिन्यात कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत की नाही हे पाहण्यासाठी बँका तुमच्या कर्ज-जबाबदार्‍या वा इतर दायित्वांची तपासणी करतात. तुमचे क्रेडिट कार्डवरील कर्ज, होम लोन, कार लोन इ. तुमच्यावर आधीच असलेल्या जबाबदार्‍यांचे पैसे भरल्यावर तुमच्याकडे पैसे आहेत की नाही हे पाहतात.

सिबिल स्कोअर: लग्नासाठी कर्जाचा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा यासाठी तुमचा सिबिल स्कोअर निर्णायक घटक ठरू शकतो. लग्नासाठी कर्जाचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर 800च्या वर असावा अशी भारतातील कर्ज देणार्‍यांची मागणी असते. क्रेडिट कार्डची देयके भरण्यात, क्रेडिटचा वापर करण्यास आणि कर्जाची परतफेड करण्यासत तुम्ही किती सक्षम आहात हे या स्कोअरवरुन दिसते.

2. कमाल लोन रक्कम

पर्सनल लोन अंतर्गत तुम्हाला मिळणारी कमाल लोन रक्कम प्रत्येक कर्ज देणार्‍यानुसार बदलते. तुम्हाला किती जास्त कर्ज मिळू शकते हे ठरण्यात तुमचे उत्पन्न महत्त्वाची भूमिका बजावत असताना, तुमचा सिबिल स्कोअर उत्कृष्ट असल्यास तुम्ही बँकेशी वाटाघाटी करु शकता. तुम्हाला नेमकी किती रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते याचा अंदाज घेण्यासाठी पर्सनल लोन अ‍ॅपचा वापर करणे हा सोपा मार्ग आहे. तुम्हाला मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळवण्यासाठी तुमची बँक किंवा वित्त संस्था ‘टॉप-अप’ सुविधा देते का हे पाहा.

3. व्याजदर, प्रक्रिया शुल्क, इतर शुल्क

लग्नासाठीचे कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे आणि त्यावर जास्त व्याजदर असते. सर्व बँकाशी वाटाघाटी करण्याची शक्यता असली तरी तुम्ही आजूबाजूला इतर ठिकाणीही चौकशी करु शकता. प्रक्रिया शुल्क आणि दस्तावेजीकरण शुल्क यासारखे शुल्क लक्षात ठेवा कारण तुमचे कर्ज मंजूर झाल्यावर ते आगाऊ भरावे लागेल.

मुदत संपण्यापूर्वी कर्जाची परतफेड करावी असे वाटत असेल तर कर्जदत्याने देऊ केलेल्या कर्जावर प्रीपेमेंट आणि फोरक्लोजरसाठीचे शुल्क तपासून घ्या. काही वित्त संस्था ऑटो-डेबिट सुविधाही देऊ शकतात आणि कर्जाच्या परतफेडीसाठी तुम्ही ते सेट करु शकता.

4. कर्ज परतफेडीचे पर्याय

तुमच्या लग्नाच्या कर्जासाठी तुम्ही भरत असलेला मासिक हप्ता तीन मुख्य घटकांवर अवलंबून आहे: कर्जाची रक्कम, व्याजदर आणि लोनचा कालावधी. तुमच्या लग्नासाठी लागणारी कर्जाची रक्कम आणि तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ती रक्कम ठरल्यावर तुम्हाला भरावयाचा ईएमआय काढण्यासाठी online EMI calculator (ऑनलाईन ईएमआय कलक्युलेटर) वापरा. तुमच्यासाठी सगळ्यात योग्य ईएमआय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मुदतीचे आकडे घाला पण असे करत असताना तुमच्या परतफेडीच्या जबाबदारीचा व्याजाचा घटक वाढणार नाही याची खात्री करुन घ्या.

वरील सर्व बाबींची पूर्तता करणारा वित्तपुरवठा पर्याय म्हणजे बजाज फिनसर्व्हकडील विवाह कर्ज. या पर्सनल लोनचा उपयोग लग्नाशी संबंधित सगळे खर्च भागवण्यासाठी होऊ शकतो. पण तुम्ही जेव्हा प्रक्रिया शुल्क, दस्तावेजीकरण शुल्क, प्रीपेमेंट शुल्क आणि व्याजदरावर फोरक्लोजर शुल्काचा विचार करता तेव्हा विवाह कर्ज पटकन महाग होते. लग्नासाठी कर्ज घेण्यास जाण्यापूर्वी या काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन फॉर मॅरेजमध्ये तुमच्यासाठी 25 लाख रुपये मंजूर होऊ शकतात अणि
60 महिन्यांचा दीर्घ परतफेड कालावधीचा आनंद घेऊ शकता. तुमचे सुरुवातीचे ईएमआय 45%* ने कमी करण्यासाठी तुम्ही फ्लेक्झी लोन सुविधा निवडू शकता. तुमची प्री-अप्रुव्हड ऑफर आजच पहा आणि तुमच्या स्वप्नातील लग्नासाठी पैसे मिळवा.

*अटी व शर्ती लागू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT