Radhakishan Damani becomes India’s 2nd richest person 
अर्थविश्व

राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरवर मिळतोय खरेदीचा सिग्नल

सुमित बागुल

आपण ज्या डी मार्टमधून घरातील सामान किंवा वरच्यावर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणतो त्याचे दमानी हे मालक आहेत.

भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक नाव म्हणजे राधाकिशन दमानी. आपण ज्या डी मार्टमधून घरातील सामान किंवा वरच्यावर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणतो त्याचे दमानी हे मालक आहेत. दमानी यांची एकूण निव्वळ मालमत्ता तब्बल १५.४ बिलियन अमेरिकन डॉलर एवढी आहे. त्यांनी त्यांचं हे साम्राज्य उभं केलं शेअर बाजारातील गुंतवणुकीतून. त्यामुळे साहजिकच दमानी कोणते शेअर घेतात, कोणते विकतात यावर तुमच्या आमच्या सोबत मोठ्या गुंतवणूकदारांची आणि तज्ज्ञांची कायम नजर असते. असाच एक स्टॉक जो दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे तो विकत घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. या कंपनीचं नाव आहे मेट्रोपोलीस हेल्थकेअर (Metropolis Healthcare).

कोरोनाच्या लाटांमुळे फार्म कंपन्या आणि डायग्नोस्टिक कंपन्यांना चांगलाच नफा झालाय. अस्र्थत म्हणूनच या कंपन्यांचे शर्स चांगलेच पाळायला लागलेत. मेट्रोपोलीस हेल्थकेअर (Metropolis Healthcare) या डायग्नोस्टिक कंपनीच्या स्टॉकने मागच्या एका महीन्यात जवळपास 20 टक्के परतावा दिला आहे. टेक्निकली चार्ट वाचल्यास 2 हजार 600 रुपयांवर ब्रेकआउट सुध्दा झाला. अशात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार Metropolis Healthcare या शेअरची किंमत आता आणखी वाढू शकते आणि येत्या तीन महीन्यात एका शेअरची किंमत 3 हजार 100 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

कोरोनाची दुसरी लाट पसरल्यामुळे मागच्या काही महिन्यात सर्व डायग्नोस्टिक कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळेच या तिमाहीत मार्जिन आणखी वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. या शेअरने 2,600 रुपयांवर ब्रेकआउट दिला आहे आणि सध्या हे शेअर्स याच किमतीवर ट्रेड करतायत. ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स खरेदी केले नसतील ते सध्याच्या किमतीवर याची खरेदी करू शकतात.

Metropolis Healthcare या कंपनीचा शेअर गुरुवारच्या सत्रात 2,841 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांच्या माहितीनुसार यामध्ये 2,700 रुपयांच्या किमतीवर खरेदी केल्यास उत्तम. यासाठी 2 हजार 670 रुपयांवर स्टॉपलॉस लावणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. (Radhakishan Damani ) राधाकिशन दमानी यांच्या जवळ या कंपनीत २०२१ मार्च तिमाहीपर्यंत 1.70 टक्के भागीदारी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT