bank Google
अर्थविश्व

Mirae Asset ने बँकांमध्ये स्टेक वाढवला, HDFC बँक, ICICI मध्ये जास्त भागीदारी

सुमित बागुल

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी मीराइ अ‍ॅसेटने (Mirae Asset) मे महिन्यात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आपला भाग वाढवला आहे. मीराइ एसेटची 70,000 कोटी रुपयांची इक्विटी अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) आहे. गेल्या महिन्यात कंज्यूमर ड्यूरेबल्स, इन्शुरन्स, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग खरेदी केले आहेत. (Mirae Asset, with Rs 70,000 cr in AUM, raises stake in banks: ICICI, HDFC Bank among top 10 holdings)

ब्रोकींग कंपनी मोतीलाल ओसवालच्या आकडेवारीनुसार मीराइ अ‍ॅसेटने खासगी बँकांमध्ये खरेदी केली आहे, ज्यात आधीपासून जास्तीत जास्त २० टक्के वेटेजचे ऍलोकेशन आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कंझ्युमर ड्यूरेबल कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या आणि NBFC मध्ये होल्डिंग वाढवली आहे. त्यात पाच टक्क्यांपेक्षा कमी ऍलोकेशन आहे.

वाढीसाठी बराच वाव आहे आणि कमी इन्व्हेस्टनेंट असलेल्या सेक्टर्समध्ये ऍलोकेशन वाढवायचे असल्याचे मीराइ अ‍ॅसेटमधील फंड मॅनेजर यांचे म्हणणे आहे. आम्ही चांगल्या वाढीची अपेक्षा असलेल्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे असं मीराइ एसेटचे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आणि को हेड गौरव मिश्रा यांचे म्हणणे आहे. भारतातील अनेक क्षेत्रात बऱ्याच काळासाठी विस्ताराच्या संधी आहेत असंही ते म्हणतात. या क्षेत्रांमध्ये रिटेल फायनान्स, तारण , इन्शुरन्स, कन्झ्युमर गुड्स आणि ऑटोमोबाईचा समावेश आहे.

मीराइ एसेट च्या होल्डिंग्समध्ये HDFC Bank, ICICI Bank, Infosys, RIL, Axis Bank, TCS, Maruti Suzuki आणि Dr Reddy’s Laboratories यांचा समावेश आहे.

HDFC Bank, रिलायंस इंडस्ट्रीज (RIL), Mphasis, HCL Technologies, SBI Life, JK Cements, मारुति सुजुकी आणि Axis Bank या कंपन्यांनी जास्तीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT