mobile data use increase in india in 2019 till september Photo Source : developmentnews.in 
अर्थविश्व

सप्टेंबरपर्यंतच भारतीयांनी किती इंटरनेट डेटा 'फस्त' केला पाहा!

सकाळ डिजिटल टीम

Mobiel Data फ्लॅशबॅक 2019  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाऊन, भारतात सर्वाधिक स्वस्त डेटा मिळत असल्याचं सांगितलं होतं. त्याचा प्रत्यय यावर्षी आलाय. यंदा केवळ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीत भारतीय नागरिकांनी इंटरनेट डेटा वापरात शिखर गाठलंय. ट्राय देशातील एकूण वायरलेस डेटाच्या वापरात मोठी वाढ झाल्याची माहिती ट्रायने दिला आहे.

2014 मध्ये 82.8 कोटी जीबी असलेला मोबाईल डेटाचा वापर 2018 मध्ये 4640.4 कोटी जीबीवर पोचला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 2019 मध्ये यामध्ये आणखी वाढ होत सप्टेंबर महिन्यापर्यंतच 5491.7 कोटी जीबी डेटा वापरला गेल्याची माहिती ट्रायच्या विश्लेषणातून समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाहा मोबाईल यूजर्स किती?
भारतातील एकूण मोबाईल डेटा ग्राहकांची संख्या 2014 मध्ये 28.158 कोटी इतकी होती. सप्टेंबर 2019 मध्ये ही संख्या वाढून 66.48 कोटींवर पोचली आहे. 018 मध्ये वार्षिक 36.36 टक्क्यांची वाढ यात झाली आहे. मागील चार वर्षात मोबाईल डेटाच्या वापरात अभूतपूर्व वाढ झाली आहे. मोबाईल डेटाचा वापर मुख्यत: संपर्क आणि मनोरंजन यासाठी केला जातो आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तसेच 4 जीच्या आगमनामुळे डेटा वापरात प्रचंड वाढ झाली आहे. यापुढील काळातदेखील मोबाईल डेटा वापरात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दूरसंचार सेवांच्या दरांमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना डेटा तुलनात्मकरित्या स्वस्त दरात उपलब्ध होतो आहे. 

गेल्या वर्षभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मोबाईलवरच वापर जास्त 
मोबाईल नेटवर्कचे 2 जी मधून 4 जीमध्ये झालेले अद्ययावतीकरण स्मार्टफोनमध्ये सहजपणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्यामुळे मोबाईल इंटरनेट वापरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिवाय मोबाईल मधील माहिती आता फक्त इंग्रजी आणि हिंदीपुरतीच मर्यादित न राहता प्रादेशिक भाषांमधूनही उपलब्ध होऊ लागली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होत मोबाईल इंटरनेट डेटाचा वापर कित्येक पटींनी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT