Bitcoin Sakal
अर्थविश्व

Cryptocurrency वर बंदी आणल्यास तुमच्या पैशांचं काय होणार?

ओमकार वाबळे

तुम्हालाही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यात रस असेल किंवा त्यात पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारत सरकार लवकरच क्रिप्टो चलनावर पूर्णपणे बंदी घालणार आहे. 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार तीन अध्यादेशांसह 26 नवीन विधेयके मांडणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी मंगळवारी सायंकाळी जाहीर झालेल्या विधिमंडळाच्या कार्यसूचीतून ही माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये ज्या बिलावर लोकांच्या नजरा सर्वात जास्त खिळल्या आहेत ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी बिल. मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार की काही निर्बंधांसह त्यामध्ये व्यापार करण्यास परवानगी देणार? हे सर्व विधेयक आल्यानंतरच कळेल. क्रिप्टोकरन्सीशी संबंधित बिलाचे नाव 'द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021' आहे.

बंदी घातली तर तुमच्या क्रिप्टोकरन्सीचं काय होईल?

असं मानलं जातं की हे विधेयक बिटकॉइनसह इतर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी नवीन समस्या निर्माण करू शकतं. जर सरकारने क्रिप्टोवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर बँक आणि तुमचे क्रिप्टो एक्सचेंजेसमधील व्यवहार थांबण्याची शक्यता आहे. अशामुळे तुम्ही कोणतेही क्रिप्टो खरेदी करण्यासाठी स्थानिक चलन रुपांतरित करू शकणार नाही. यासह, तुम्ही त्याची पूर्तता देखील करू शकणार नाही.

जगात 7 हजारांहून अधिक नाणी चलनात

सध्या जगभरात ७ हजांराहून जास्त विभिन्न क्रिप्टो नाणी चलनात आहेत. हे एक प्रकारचं डिजिटल नाणं आहे. तर 2013 पर्यंत जगात फक्त एकच क्रिप्टोकरन्सी BitCoin होती. हे 2009 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. बिटकॉइन अजूनही भारतासह संपूर्ण जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT