दिवाळीच्या शुभ दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग केले जाते, अतिशय जुनी ही परंपरा आजही जोपासली जाते. आजच्या दिवसाबद्दल अधिक सांगण्याआधी मागच्या आठवड्यात बाजारात काय परिस्थिती होती जाणून घेऊया.
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 104.25 अंकांनी वाढून 59,307.15 वर बंद झाला.
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर 2021 ला दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंग होते. एका तासाच्या या सत्रात बीएसई सेन्सेक्स 60 हजारांच्या वर पोहोचला होता. मुहूर्तावर सेन्सेक्स 60,067 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 17,921 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. यावेळी सुद्धा मुहूर्त ट्रेडिंगबाबत गुंतवणूकदार सकारात्मक दिसत आहेत.
परंपरा
शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 1957 मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये 1992 मध्ये मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा सुरू झाली. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बहुतेक लोक या दिवशी शेअर्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
कोटक सिक्युरिटीजने मुहूर्त ट्रेडिंग पोर्टफोलिओसाठी चांगले फंडामेंटल्स असलेले 3 स्टॉक्स निवडले आहेत. तुम्हीही मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक शोधत असाल, तर ही बातमी पूर्ण वाचा...
1. ॲक्सिस बँक (Axis Bank)
कोटक सिक्युरिटीजने मुहूर्त ट्रेडिंगसाठी खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेची निवड केली आहे. ॲक्सिस बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे (Q2FY23) निकाल मजबूत राहिले आहेत. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेचे निव्वळ इंटरनेट उत्पन्न (NII) 31 टक्क्यांनी वाढले आहे.
17 ऑक्टोबरला ब्रोकरेज हाऊसने स्टॉकमध्ये 960 रुपयांचे टारगेट दिले होते. 21 ऑक्टोबर रोजी शेअर 900.5 रुपयांवर बंद झाला. स्टॉकने एका आठवड्यात 12.84%, एका वर्षात 11.45%, 3 वर्षात 26.9% आणि 5 वर्षात 95.61% परतावा दिला आहे.
2. इन्फोसिस (Infosys)
ब्रोकरेज हाऊसने दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसची निवड केली आहे. ग्राहकांचा डिजिटल प्रवास पुढे नेण्यात इन्फोसिस आघाडीवर असेल. ब्रोकरेजने प्रति शेअर 1750 रुपयांचे टारगेट दिले आहे.
3. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra)
कोटक सिक्युरिटीजने ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी निवड केली आहे. आगामी तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. ब्रँड, डिझाइन आणि तंत्रज्ञान यामुळे कंपनी भारतातील ईवी (Electric Vehicle) क्रांतीचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. त्यांनी शेअरसाठी 1500 रुपयांचे टारगेट दिले आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.