reliance jio Sakal
अर्थविश्व

मुकेश अंबानींच्या कंपनीत कमाईची संधी! येतोय Reliance Jio चा IPO

मुकेश अंबानींच्या कंपनीत कमाईची संधी! येतोय Reliance Jio चा IPO

सकाळ वृत्तसेवा

एलआयसी व्यतिरिक्त मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा IPO या वर्षी मार्केटमध्ये येऊ शकतो.

एलआयसी (LIC) व्यतिरिक्त मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) टेलिकॉम कंपनी Reliance Jio चा IPO या वर्षी इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering - IPO) मार्केटमध्ये येऊ शकतो. मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा IPO यावर्षी प्राथमिक बाजारात दार ठोठावू शकतो, असे वृत्त आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म CLSA च्या मते, रिलायन्स जिओ यावर्षी लिस्ट होऊ शकते. CLSA नुसार, त्याचे मूल्यांकन 7.40 लाख कोटी म्हणजेच $100 बिलियन अपेक्षित आहे. त्याच्या लिस्टिंगनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील (Reliance Industries) ही दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल, म्हणजेच हा देशातील दुसरा सर्वात मोठा IPO असू शकतो. (Mukesh Ambani's company Reliance Jio's IPO is coming in the market)

काय म्हणतेय CLSA?

ब्रोकरेज फर्म CLSA ने एका नोटमध्ये म्हटले आहे की मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा IPO यावर्षी लॉंच होऊ शकतो आणि त्याचे मूल्य सुमारे $100 अब्ज असू शकते. CLSA विश्‍लेषकांनी सांगितले, की 2020 मध्ये Jio चा सुमारे 33 टक्के स्टेक 13 गुंतवणूकदारांना विकला गेला आहे. यापैकी जवळपास 10 टक्के फेसबुकला (Facebook) आणि 8 टक्के गूगलला (Google) विकले गेले. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ऑक्‍टोबर 2021 मध्ये त्याचे 42 कोटींहून अधिक ग्राहक होते.

सीएलएसएने म्हटले आहे की, 'रिलायन्स जिओची स्वतंत्र सूची भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी प्रेरक ठरू शकते. CLSA विश्‍लेषकांनी Reliance Jio ला 11.5x EV/Ebita वर $99 अब्ज ईव्ही मूल्य दिले, ज्यात JioFiber साठी $5 अब्ज EV चा समावेश आहे.

2016 मध्ये झाली होती एंट्री

रिलायन्स जिओने 2016 मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीत (Telecom Industry) प्रवेश केला होता. यानंतर कंपनीने फ्री कॉलिंग आणि डेटाच्या माध्यमातून टेलिकॉम इंडस्ट्रीत प्राइस वॉर सुरू केले. त्यामुळे देशातील अनेक दूरसंचार कंपन्यांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. त्याचवेळी काही कंपन्यांनी विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारला. सध्या टेलिकॉम उद्योगात रिलायन्स जिओची एअरटेलशी स्पर्धा आहे. Airtel व्यतिरिक्त, Vodafone-Idea देखील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT