mutual funds. Sakal
अर्थविश्व

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, जर 'असं' असेल तर तुमचे गुंतवले पैसे काढताच येणार नाहीत..

सुमित बागुल

जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण या बातमीकडे तुम्ही कानाडोळा केलात तर कदाचित तुमची म्युच्युअल फंडाची SPI बंद देखील होऊ शकते. जर तुम्ही तुमचं आधार आणि PAN नसेल केलं तर ते ३० जून आधी करून घ्या. जर या डेडलाईन पर्यंत तुमचं आधार आणि पॅन लिंक झालं नाही तर तुमची SPI बंद होऊ शकते. याचं कारण म्हणजे जर तुमचं पॅन कार्ड आधरसोबत जोडलेलं नसेल तर ते अवैध ठरणार आहे. तसं झाल्यास तुमची SIP तर थांबेलच पण तुमचे म्युच्युअल फंडातील पैसे देखील तुम्ही काढू शकणार नाहीत. तुमचं खातं अपूर्ण KYC या श्रेणीत टाकलं जाईल. (Mutual fund SIPs to bank TDS: Here's why you need to link PAN-Aadhaar by June 30)

शासनाकडून PAN कार्ड आणि आधार लिंक करायची शेवटची तारीख ३० जून ठरवण्यात आली आहे. जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुम्हाला आयकर कायद्यान्वये १० हजारांचा दंड देखील भरावा लागू शकतो. यापेक्षाही मोठं संकट म्हणजे तुमचं पॅन कार्ड अवैध ठरवलं जाऊन ते ऍक्टिव्ह राहणार नाही. म्हणजेच तुमचं PAN Card तुम्ही कोणत्याही KYC साठी वापरू शकणार नाहीत.

म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगतात की जर गुंतवणूकदाराने त्यांचं आधार आणि PAN लिंक केलं नाही तर त्यांचं पॅन कार्ड अवैध ठरवलं जाईल. अशात गुंतवणूकदाराची KYC रद्द झाल्याने त्याचा परिणाम थेट गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर होईल. म्हणूनच ज्यांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे त्यांनी ३० जून आधी PAN आणि आधार कार्ड लिंक करणं जरुरी आहे.

पॅन आणि आधार कसं लिंक कराल

  • आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या संकेतस्थळावर जा

  • त्यातील 'Our services' या विकल्पावर जा आणि त्यामधील 'LINK AADHAR' यावर क्लिक करा

  • त्यानंतर आपल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डाचे नंबर भरा

  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार आणि पॅन कार्डवर असणारं नाव सारखं हवं

  • जर तुमच्या आधार कार्डावर जन्म साल असेल तर खाली दिलेल्या छोट्या बॉक्सवर क्लिक करा

  • त्यानंतर ‘Link Aadhaar’ यावर क्लिक करा.

  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल

  • OTP टाकून माहिती सबमिट केल्यावर आधार आणि पॅन लिंक होईल


    नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चाकरूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT