IPO Sakal
अर्थविश्व

स्मार्ट विश्‍लेषण : डेटा पॅटर्न्स इंडियाचा ‘आयपीओ’ कसा आहे?

१९८५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आपल्या देशांतर्गत जी संरक्षणविषयक उत्पादने तयार होतात, त्यांना इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स पुरविते.

नंदिनी वैद्य

प्रश्न - डेटा पॅटर्न्स इंडियाची प्राथमिक माहिती सांगाल का?

१९८५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आपल्या देशांतर्गत जी संरक्षणविषयक उत्पादने तयार होतात, त्यांना इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स पुरविते. ‘मेक इन इंडिया’ थीमला पूरक असे कंपनीचे व्यवसायाचे मॉडेल आहे. फक्त ‘मेक इन इंडिया’ नाही, तर त्या पलीकडे जाऊन ‘डेव्हलप, इनोव्हेट इन इंडिया’ यावर कंपनीचा जोर आहे. संरक्षण क्षेत्रातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि स्पेस अशा सर्वांना ही कंपनी सेवा देते. चेन्नई येथून कंपनीचा सर्व व्यवसाय चालतो. इलेक्ट्रोनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, फर्मवेअर, मेकॅनिकॅल डिझाइन आणि डेव्हलपमेंट यांमध्ये कंपनीची विशेष क्षमता आहे.

प्रश्न - या कंपनीच्या ‘आयपीओ’ला अर्ज करण्यासाठी उपयुक्त अशी माहिती सांगाल का?

येत्या १४ ते १६ डिसेंबर २०२१ दरम्यान कंपनीचा ‘आयपीओ’ चालू असेल. नोंदणी २४ डिसेंबर रोजी दुय्यम बाजारात होईल. किंमतपट्टा रु. ५५५ ते ५८५ असून कमीतकमी २५ (रु. १४,६२५) शेअर व त्याच्या पटीत अर्ज करता येईल.

प्रश्न - एकूण कंपनीची आर्थिक प्रगती कशी आहे?

मागील तीन वर्षांमध्ये कंपनीच्या एकूण मालमत्तेत रु. २७७ कोटींपासून ३२८ कोटी इतकी वाढ झाली आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान उत्पन्न/विक्री रु. १३२ कोटींवरून २२६ कोटींपर्यंत पोचले, तर नफा रु. ७.७ कोटींवरून ५५ कोटी इतका लक्षणीय वाढला. एकूण आर्थिक आघाडीवर घोडदौड जोरात चालू आहे.

प्रश्न - कंपनीची बलस्थाने व कमकुवत बाबी काय सांगता येतील?

बलस्थाने -

१. मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचे उत्पन्न सीएजीआर ३१ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सध्याची उत्पादनक्षमता दुपटीने वाढविण्याचा कंपनीचा संकल्प आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठीच ही समभाग विक्री केली जात आहे.

२. अंदाजे पुढील अडीच वर्षे पुरतील एवढ्या ऑर्डर कंपनीकडे आहेत.

३. ठराविक ग्राहकांकडून पुनःपुन्हा येणाऱ्या ऑर्डरमुळे ग्रॉस मार्जिन ६५-७० टक्के, तर निव्वळ नफा मार्जिन २४ टक्के इतके जास्त मिळत आहे. थोडक्यात, ‘हाय मार्जिन बिझनेस’ आहे.

कमकुवत बाबी -

१. अशा प्रकारच्या व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. रु. २७० कोटी भांडवलामध्ये सुमारे २२० कोटी हे कर्जदारांमध्येच अडकले आहेत. त्यामुळे येथून व्यवसायात वाढ हवी असेल, तर अधिक भांडवल आवश्यकच आहे. त्या हेतूने देखील हा ‘आयपीओ’ आणला आहे.

२. कंपनीकडे जी फिक्स्ड स्वरुपाची रु. ३५ कोटींची मालमत्ता आहे, ती याच क्षेत्रात असणाऱ्या इतर कंपन्यांपेक्षा (पारस डिफेन्स, एमटीआर टेक आदी) खूप कमी आहे.

प्रश्न - याच क्षेत्रातील दुय्यम बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे तुलनात्मक स्थान कसे ठरविता येईल?

मागील १२ महिन्यांच्या प्रतिशेअर नफ्याचा (रु. १८) विचार करता, रु. ५८५ इश्यू किंमत धरल्यास पीई रेशो ३३ च्या जवळपास येतो. नुकत्याच शेअर बाजारात नोंदणी झालेल्या पारस डिफेन्स, एमटीआर टेक यांचे पीई रेशो अनुक्रमे ६६ व १२० इतके जास्त आहेत.

प्रश्न - ‘आयपीओ’ला अर्ज करायचा झाला, तर त्याची किंमत योग्य वाटते का? तसेच गुंतवणूकदारांनी काय करावे?

याच क्षेत्रातील बाजारात असलेल्या कंपन्यांच्या तुलनेत कंपनीने पब्लिक इश्यू निश्चितच वाजवी दराने आणला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेमुळे सध्या संरक्षण क्षेत्र गुंतवणूकदारांचे आवडीचे क्षेत्र झाले आहे. मागच्या सहा महिन्यांत पारस डिफेन्स, एमटीआर टेक यांची नोंदणी खूप चांगली झाली आहे.

मजबूत ऑर्डर बुक, खूप जास्त मार्जिन मिळणारा व्यवसाय, युनिक बिझनेस मॉडेल आणि साहजिकच त्यामुळे कमी स्पर्धा या बलस्थानांमुळे कंपनी दिवसेंदिवस अधिक प्रगती करीत आहे. परंतु, नोंद घेण्याजोगी एक बाब म्हणजे एकूण रु. ५८८ कोटींचा हा इश्यू असून, त्यातील ३५ टक्के रक्कम छोट्या गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. एकूण छोटा इश्यू आणि बाजाराची लाडकी ‘थीम’ असल्यामुळे या इश्यूला मोठा प्रतिसाद मिळू शकेल. त्यानुसार गुंतवणूकदारांनी लिस्टिंग गेन/दीर्घ मुदतीसाठी शेअरला अर्ज करून आपले नशीब आजमविण्यास हरकत नाही. परंतु, सर्वांनाच शेअरवाटप होणे अवघड असते. त्यामुळे जर ‘आयपीओ’मध्ये शेअर मिळाले नाहीत, तर नंतर नोंदणी झाल्यावर दुय्यम बाजारातून खरेदी करता येऊ शकतात.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT