- शिल्पा गुजर
सचिन बन्सल यांची कंपनी ‘नावी’ एमएफ इलेक्ट्रिक व्हेइकल (Electric Vehicle) आता म्युच्युअल फंड आणणार आहे. यासाठी या कंपनीनं सेबीकेड अर्जही दाखल केला आहे. नावी म्युच्युअल फंडाने यासाठी सेबीकडे चायना फंडासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची गुंतवणूक असलेली नवी म्युच्युअल फंड (Navi Mutual Fund) गुंतवणूकदारांसाठी अनेक नवीन पॅसिव्ह फंड आणायची तयारी करत आहे. त्यात इलेक्ट्रिक व्हेईकल फंडाचाही समावेश आहे.
नावी (NAVI) म्युच्युअल फंडाने नावी इलेक्ट्रिक व्हेइकल आणि ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी फंड ऑफ फंड (FoF) साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. या FoF चे ध्येय ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेइकल आणि ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी NET इंडेक्सचा मागोवा (Track) घेणे आहे. या इंडेक्समध्ये इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि ड्रायव्हिंग तंत्रज्ञानामध्ये नवनवीन काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहे.
या निर्देशांकाच्या (Index) कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी, एफओएफ (FoF) एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि इंडेक्स फंड या दोघांत किंवा त्यापैकी एकात गुंतवणूक करू शकतो. कंपनीने ज्या दोन आंतरराष्ट्रीय निधींसाठी अर्ज केला आहे, त्यात नवी एस अँड पी 500 एफओएफ आणि नवी टोटल चायना इंडेक्स फंड एफओएफ यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यातही नवी म्युच्युअल फंडाने सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. हे सगळेही पॅसिव्ह फंड्स होते.
इलेक्ट्रिक व्हेईकल फंड व्यतिरिक्त, नवी म्युच्युअल फंडाने दोन आंतरराष्ट्रीय आणि 'नावी निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड' साठीही कागदपत्रे सादर केली आहेत. नवी निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फंडच्या कंपन्यांचा समावेश असेल आणि निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सचा मागोवा घेईल.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.