नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याला काही नियमांत बदल होत असतो. येणाऱ्या १ जूनपासूनही काही नियम बदलणार आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यावर या बदलांचा फरक पडू शकतो. काही बदल प्रत्यक्ष तुमच्या खिशाला झळ पोचवू शकतात. त्यामुळे कोणत्या नियमांत बदल होणार आहे याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. १ जूनपासून मुख्य ६ मोठे कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.
१. PF अकाउंट आधारसोबत लिंक करावे लागणार-
EPFO च्या नवीन नियमांनुसार प्रत्येक खातेधारकाला PF अकाउंट Aadhaar card सोबत लिंक करावे लागणार आहे. त्यामुळे तुमचे अकाउंट आधारशी लिंक आहे का नाही ते चेक करून ते लिंक करावे लागणार आहे. याबद्दल EPFO कडून नोटिफिकेशनही दिले गेले आहे. लवकरात लवकर हे काम आटपून घ्या.
२ बँकींग सेवेतही बदल होणार आहेत. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी १ जून २०२१ पासून चेकने पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे.
३. Google Photos चा वापर मोफत नसणार-
व्हिडीओ आणि फोटोंच्या बॅकअपसाठी Google Photos या ऍपचा उपयोग केला जातो. आता इथं फोटोस किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत ही सेवा मोफत होती पण १ जूनपासून ही मोफत सेवा बंद होणार आहे.
४.LPG सिलेंडरची किंमत वाढू शकते-
नवीन महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG किंमतीत बदल करून शकतात. त्यामुळे १ जूनपासून गॅसच्या किंमती कमी किंवा वाढू शकतात.
५. इनकम टॅक्सची नवीन वेबसाईट-
१ जून ते ६ जूनपर्यंत इनकम टॅक्स डिपार्टमेंटची साईट बंद राहणार आहे. ७ तारखेपासून नवीन वेबसाईट आल्यावर कर भरता येणार आहे.
६. YouTube पासून मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स-
YouTube पासून पैसे मिळवणाऱ्यांना १ जूनपासून कर भरावा लागणार आहे. पण तुम्हाला त्याच views चे पैसे द्यावे लागणार आहेत जे अमेरिकेतून आले आहेत. हा बदल १ जून २०२१ पासून लागू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.