अर्थविश्व

नव्या PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल 25 टक्के बचत

सूरज यादव

स्टोव्हमुळे पीएनजीसाठी कमी गॅस खर्च होईल. यामुळे महिन्याच्या बिलामध्ये 25 टक्के बचत होईल असंही सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने नवीन गॅस स्टोव्ह तयार केला आहे. घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी याचा वापर करता येईल. स्टोव्हमुळे पीएनजीसाठी कमी गॅस खर्च होईल. यामुळे महिन्याच्या बिलामध्ये 25 टक्के बचत होईल असंही सांगण्यात आलं आहे. पीसीआरएने एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडसोबत एक करारसुद्धा केला आहे. उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत संयुक्त असा हा उपक्रम आहे. यातून ग्राहकांना पीएनजी बेसड स्टोव्हज देण्यात येणार आहे. एनर्जी इफिसिअंट पीएनजी कूक स्टोव्ह उपक्रमांतर्गत स्टोव्हचे वितरण केले जाईल.

ईईफीएस उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील निवडक शहरांमध्ये 10 लाख पीएनजी कुकिंग स्टोव्ह देण्यात येतील. हा कार्यक्रम संबंधित क्षेत्रातील सर्व पीएनजी ग्राहकांसाठी असेल. ग्राहक स्टोव्हसाठी दोन पद्धतीने पैसे देऊ शकतात. यामध्ये ईएमआयचा पर्ययासुद्धा आहे. ईईएसएल या उपक्रमाची अंमलबजाणी गुंतवणुकदारांच्या माध्यमातून करणार आहे. ईईएसएल ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत हे स्टोव्ह पुरवणार आहे.

पीएनजीसाठीचे विशेष गॅस स्टोव्ह नसल्यास ग्राहकांनी एलपीजी गॅससाठीचे स्टोव्हज वापरले. याची तापमान क्षमताही 40 टक्क्यांनी कमी झाली. परिणामी गॅस अधिक खर्च होतो आणि सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा यात थोडी तडजोड असते असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

ईईएसएलच्या अंदाजानुसार सध्याच्या सर्व पीएनजी ग्राहकांनी नवीन गॅस स्टोव्हचा वापर केल्यास जवळपास 3 हजार 901 कोटी रुपयांची बचत होईल. प्रत्येक ग्राहक 100 ते 150 रुपयांपर्यंत बचत करू शकेल. तसंच कार्बनचे उत्सर्जनसुद्धा 11 मिलियन टन इतकं कमी होईल. फक्त ग्रीन अँड क्लीन नव्हे तर सुरक्षेसाठीही हा स्टोव्ह उपयुक्त असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पीएनजी गॅस स्टोव्ह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडूनने तयार केला आहे.

पीएनजी स्टोव्ह ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसह स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत. पीएनजी ग्राहकांसाठी पीएनजी गॅस स्टोव्ह हे वेगवेगळ्या योजनांमधून मिळावेत यासाठी ईईएसएलसोबत करार केल्याचं पीसीआरएचे डॉक्टर निरंजन कुमार सिंग यांनी म्हटलं आहे. सध्या 74 लाख पीएनजी ग्राहक देशात आहेत. महिन्याला 80 हजार नवीन ग्राहकांची भर पडत असल्याचं पीसीआरएनं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT