केंद्रीय अर्थ मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांचे परिषद औरंगाबादेत घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने या परिषदेला मार्गदर्शन करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन  
अर्थविश्व

'जनधन'मुळे सर्वसामान्य आर्थिक साक्षर, निर्मला सीतारमन यांचे मत

प्रकाश बनकर

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'सबका साथ सबका, सबका विकास आणि सबका विश्वास' या सूत्रानुसार देशात विविध योजना मी राबवले आहेत. तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणत त्यांना आर्थिक साक्षर करण्यासाठी जनधन योजना राबवण्यात आली. या माध्यमातून सर्वसामान्य माणूस आर्थिक साक्षर झाला असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी औरंगाबादेत गुरुवारी (ता.16) सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत (Public Banks Manthan In Aurangabad) व्यक्त केले. केंद्रीय अर्थ मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांचे परिषद औरंगाबादेत घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने या परिषदेला मार्गदर्शन करताना सीतारमन बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Union Minister Of State For Finance Bhagwat Karad), केंद्रीय अर्थ विभागाचे सहसंचालक बीकेसी नाव, इंडियन बँक ऑफ असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज किरण राय, एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश खरा, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एच.मलिकार्जुन राव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. निर्मला सीतारमन म्हणाल्या, की जनधन योजना सुरू करताना झिरो बॅलन्स खाते सुरू करण्यास बँका तयार होतील अशी अनेकांना शंका होती. मात्र बँकांनी खाते उघडले व जनधनमुळेच कोविडच्या काळात महिलांना मदत देता आली. पूर्वी लोक बँकेत जाण्यास घाबरत होते. त्यामुळे सर्वसामान्यांची भीती दूर झाली. त्यांचा व्यवहार करत आहेत. जनधन योजनेला आधार लिंक झाल्यामुळे गैरव्यवहार ही कमी झाले आहेत. जनधन योजनेमुळे स्वनिधी सारख्या योजनांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. यातून वेगवेगळ्या सबसिडी तसेच कर्ज योजना ही मार्गी लागत आहेत असेही निर्मला सीतरामन यांनी सांगितले.

देशभरात 43 कोटी जनधन खाते उघडले - डॉ.भागवत कराड

परिषदेत मार्गदर्शन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. देशातील गरिबांना मदत पोहोचली. त्यांची उन्नती कशी करावी याबाबत विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना काढल्या आहेत. अर्थ विभागातर्फे प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंतचे 43 कोटी खाते काढण्यात आली आहेत. जवळपास 82 टक्क्यांपर्यंत जनधन खाते उघडले आहेत. आजच्या परिषदेच्या माध्यमातून जास्तीत- जास्त जनधन खाते काढत भारत सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT