Business News sakal
अर्थविश्व

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, मोठ्या गुंतवणूकीची गरज नाही…

आजकाल घरबसल्या तुम्ही छोटे-मोठे उद्योग सुरू करुन पैसे कमावू शकता.

शिल्पा गुजर

Business News: आजकाल घरबसल्या तुम्ही छोटे-मोठे उद्योग सुरू करुन पैसे कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, तो म्हणजे पापड बनवण्याचा व्यवसाय. या व्यवसायाची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून आणि अगदी कमी पैशात याची सुरुवात करू शकता. भारत सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

यात मुद्रा योजनेंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीमुळे सुमारे 30,000 किलो उत्पादन क्षमता तयार होऊ शकते. यासाठी तुम्हाला 250 चौरस मीटर जागा लागणार आहे.

या खर्चामध्ये स्थिर भांडवल (Fixed Capital) आणि खेळते भांडवल (Working Capital) दोन्हींचा समावेश आहे. अहवालानुसार, स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार, कच्चा माल आणि तीन महिन्यांसाठी लागणारे रॉ मटेरियल आणि युटिलिटी प्रॉ़क्टच्या खर्चांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल या खर्चाचाही यात समावेश आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 250 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याशिवाय 3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार आणि एका सुपरवायझरची आवश्यकता असेल. यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर तुम्हाला केवळ 2 लाखांची गुतंवणूक करायची आहे.

कर्ज कुठे मिळेल ?
पापड व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम 5 वर्षांपर्यंत परत केली जाऊ शकते.

किती कमाई होईल ?
पापड तयार केल्यानंतर तो घाऊक बाजारात विकावा लागतो. याशिवाय किरकोळ दुकाने, किराणा दुकाने, सुपर मार्केटशी संपर्क साधून त्याची विक्री वाढवता येते. एका अंदाजानुसार, जर तुम्ही एकूण 6 लाख रुपये गुंतवले तर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये आरामात कमवू शकता. यामध्ये तुमचा नफा 35000-40000 पर्यंत असू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT