ज्या धंद्याचा ‘कच्चा माल’ हा पैसाच आहे, असा धंदा म्हणजे ‘बँकिंग’. या क्षेत्राला मरण नाही. प्रत्येक धंद्याला आणि प्रत्येक माणसाला पैसा लागतो. माणसाला हवा, पाणी आणि पैशाची गरज असते. या पैकी हवा आणि पाणी तसे सहज मिळते. मात्र, पैसा मिळवावा लागतो. शेअर बाजार हा पैशांचा खेळ आहे. या ठिकाणी बँकिंग क्षेत्रातील काही चांगले शेअर निवडले आणि त्यात गुंतवणूक केली, तर त्याच बँकेतील मुदत ठेवींपेक्षा (एफडी) जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.
वरील माहितीवरून असे लक्षात येईल की, स्टेट बँक आँफ इंडियाचा शेअर उत्तम परतावा देत आहे. या शेअरचा भावदेखील कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला कमी गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळू शकतो. शिवाय सरकारी बँक आहे. इतर बँकेतील किंवा शेअरमधील गुंतवणूक स्टेट बँकेत फिरवली तर परताव्याची शक्यता जास्त वाटते. थोडक्यात, भाकरी फिरवली तर जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. बघा पटतेय का? (लेखक शेअर बाजाराचे जाणकार आहेत.)
बँकिंग क्षेत्रात सरकारी आणि खासगी बँकांपैकी खालील बँका उत्तम काम करीत आहेत...
बँक सध्याचा भाव परतावा (%)
रुपये ३ महिने ६ महिने १ वर्ष
स्टेट बँक आॅफ इंडिया ४२९ २७ ५१ ११६
आयसीआयसीआय बँक ६७७ १९ २६ ७३
एचडीएफसी बँक १४४३ २ (०.०६) २८
कोटक महिंद्र बँक १७२३ (१) (६) २५
इंडस्इंड बँक ९८९ १६ ११ ९३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.