IPO IPO
अर्थविश्व

दिवाळीआधी भारतीय बाजारात 'हे' IPO येणार?

कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाली घडल्या.

ओमकार वाबळे

भारताच्या आयपीओ बाजारात या वर्षी मोठी वाढ झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच अनेक कंपन्यांनी आयपीओमधून विक्रमी निधी गोळा केला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा आकडा गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक आहे. हे वर्ष संपायला अद्याप तीन महिने बाकी आहेत. मात्र, शएअर मार्केटमध्ये अशीच गती राहिली तर हे वर्ष विक्रमी ठरणार आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाली घडल्या. यंदा ऑक्टोबरमध्ये निफ्टीची इंट्रा ट्रेड सुद्धा १८,००० च्या वर गेला.

प्रत्येक कंपनीला भारतीय शेअर बाजारातील या घोडदौडचा फायदा घ्यायचा आहे. कोरोनानंतर देशात मोठ्या प्रमाणाच डिमॅट खाती उघडली. ऑक्टोबर महिन्यात सुद्धा अनेक कंपन्या आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये Paytm, Policybazaar, Go Fashions, Nykaa आणि Sapphire Foods यांचा समावेश आहे.

नायका

नायका युनिकॉर्न स्टार्टअप आयपीओद्वारे 4000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. DRHP च्या मते, कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार दोघेही 43.1 दशलक्ष समभागांपर्यंत OFS द्वारे त्यांचे भाग काढून टाकू इच्छितात. नवीन इक्विटी जारी करून 525 कोटी रुपये जमा करू इच्छित आहे. आयपीओ नंतर, कंपनीचे प्रवर्तक कंपनीत 51 टक्के भागभांडवल कायम ठेवेल.

पेटीएम

सॉफ्टबँक आणि अँट ग्रुपच्या मालकीची असलेली पेमेंट कंपनी दिवाळीपूर्वी आयपीओ बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनी सध्या बाजार नियामक सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा या दशकातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो.

पॉलिसीबाजार

हा एक ऑनलाईन इन्शुरन्स अॅग्रीगेटर आहे. पॉलीसीबाजारने ऑगस्टमध्ये 6017 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अर्ज दाखल केले होते. कंपनीच्या मते, मिळालेल्या रकमेचा वापर त्याचा ग्राहक आधार वाढवण्यासाठी नवीन संधी शोधण्यासाठी केला जाईल.

सफायर फूड्स

बार्बीक्यूनेशन नंतर, दुसरी कंपनी QSR विभागात पदार्पण करण्यास सज्ज आहे. KFC आणि पिझ्झा हटचे ऑपरेटर IPO जारी करतील, जे DRHP नुसार पूर्णपणे OFS असतील. या ऑफर अंतर्गत क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्ट 8.50 लाख शेअर्स, नीलम फूड्स मॉरिशस लिमिटेड 55.69 लाख शेअर्स, डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लिमिटेड 48.46 लाख शेअर्स आणि अमेथिस्ट 39.62 लाख शेअर्स विकणार आहे.

गो फॅशन

महिलांच्या बॉटम-वेअर ब्रँड गो कलर्स चालवणाऱ्या फर्मने ऑगस्टमध्ये सेबीकडे आयपीओ पेपर दाखल केले आहेत. IPO मध्ये 125 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि प्रमोटर समाविष्ट आहेत. जमा झालेली नवीन रक्कम 120 अन्य ब्रँड आउटलेट्स उभारण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT