paytm to offer up to 5 lakh rupee loan to merchants know how to apply step by step process  
अर्थविश्व

Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही देखील छोटे व्यापारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. Paytm ने लहान व्यापाऱ्यांसाठी (Small Merchants) 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी एक ऑफर आणली आहे. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही. शिवाय, ते फेडण्यासाठी, पेटीएमने दररोजचा EMI पर्याय देखील दिला आहे. Paytm ने या संदर्भात शेड्यूल कमर्शियल बँक आणि NBFC सोबत भागीदारी केली आहे.

तुम्हाला हे कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला पेटीएम फॉर बिझनेस अॅपमधील 'मर्चंट लेंडिंग प्रोग्राम' (Merchant Lending Program)मध्ये जावे लागेल. पेटीएमचे अल्गोरिदम तुमच्या किंवा व्यापाऱ्याच्या दैनंदिन व्यवहारांच्या आधारे क्रेडिट-योग्यता (Credit-worthiness) तपासेल.

पूर्णपणे डिजिटल कर्ज अर्ज प्रक्रियेत तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता पडणार नाही. कर्जाची परतफेड प्रामुख्याने पेटीएमसह व्यापाऱ्याच्या दैनंदिन सेटलमेंटद्वारे केली जाते. जर तुम्हाला वेळेच्या आधी एकाच वेळी कर्ज भरायचे असेल तर कोणतेही प्री-पेमेंट शुल्क द्यावे लागत नाही.

कर्जासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

1. Paytm for Business अॅपच्या होम स्क्रीनवरील “बिझनेस लोन” आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्यासाठी उपलब्ध ऑफर तपासा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.

2. एकदा तुम्ही रक्कम निवडल्यानंतर, तुम्ही कर्जाची रक्कम, वितरित केलेली रक्कम, एकूण देय (Total Payable), दैनिक हप्ता (Daily Installment), कार्यकाल (Tenure) इत्यादी तपशील पाहू शकता.

3. आता तुम्हाला तुमच्या डिटेस्ल व्हेरिफाय करावे लागतील, चेक बॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी “Get Started” वर टॅप करा. तुमचा कर्जाचा अर्ज लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे KYC डिटेल्स CKYC कडून मिळवण्यास परवानगी देऊ शकता.

4.पुढील पेजवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड डेटा, जन्मतारीख आणि ई-मेल पत्ता यासारख्या डिटेल्स व्हेरिफाय करू शकता. जर हे डिटेल्स भरलेले नसतील तर ते भरा आणि व्हेरिफाय करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑफर व्हेरिफाय करुन पुढे जाऊ शकता. पॅन डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जाईल आणि केवायसीची व्हेरिफिकेशन केले जाईल.

5. तुमचा कर्जासाठीचा अर्ज सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रांसफर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक डिटेल्स इत्यादी काळजीपूर्वक भरा.

Paytm कंपनीने तिच्या Q3 FY22 च्या रिपेर्टमध्ये सांगितले होते की प्लॅटफॉर्मवर वितरित केलेल्या व्यापारी कर्जांची (Merchant Loan) संख्या यंदा 38% वाढली आहे, तर व्यापारी कर्जाचे मूल्य वर्ष-दर-वर्ष 128% वाढले आहे. नवीन कर्जदारांना 25% पेक्षा जास्त कर्ज वितरित केले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT