Varun Beverages sakal
अर्थविश्व

Soft Drink: Pepsi Mountain Dew विकणाऱ्या 'या' कंपनीकडून बंपर रिटर्न

सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत, कंपनीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ पटीने वाढ केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सॉफ्ट ड्रिंक बनवणारी आणि बॉटलिंग करत डिस्ट्रीब्यूट करणारी दिग्गज कंपनी वरुण बेव्हरेजेस (Varun Beverages) शेअर्स नुकतेच जवळपास दोन टक्क्यांनी वाढले आहेत. हा शेअर लाँग टर्ममध्ये मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत, त्यांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ पटीने वाढ केली आहे.

वरुण बेव्हरेजेसमधील (Varun Beverages) तेजी इतक्यात थांबणार नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या त्यांचे शेअर्स 1230 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल म्हणाले.  जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 21 टक्के जास्त आहेत. वरुण बेव्हरेजेसचे शेअर्स बीएसईवर 1015.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत. (pepsi Mountain Dew sold by Varun Beverages )

सहा वर्षांत संपत्तीत आठ पट वाढ

वरुण बेव्हरेजेसचे शेअर्स 11 नोव्हेंबर 2016 रोजी 130.04 रुपयांवर होते, जे आतापर्यंत 1015.80 रुपयांवर पोहोचले आहेत. याचा अर्थ सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास आठ पटीने वाढवली आहे. गेल्या महिन्यात, 22 सप्टेंबर 2022 रोजी, त्याचे शेअर्स 1194.80 रुपयांच्या किंमतीवर होते, जो एका वर्षातील उच्चांक आहे. विक्रीमुळे त्याचे भाव आतापर्यंत 14 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. पण, मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, यापुढे किमान 21 टक्के अर्थात 1230 रुपयाचे टारगेट दिसू शकते.

वरुण बेव्हरेजेस ही अमेरिकेबाहेर पेप्सिकोच्या सॉफ्ट ड्रींकची सगळ्यात मोठी बॉटलिंग कंपनी आहे. पेप्सी, सेव्हन अप, माउंटन ड्यू, आणि मिरिंडासारख्या शीतपेयांव्यतिरिक्त, वरूण बेव्हरेजेस फळे, दूध, पाणी आणि स्पोर्ट्स थीम असलेली पेयेही विकतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT