Petrol-Diesel Price:  esakal
अर्थविश्व

तेल कंपन्यांची वाईट अवस्था; दर न वाढल्यामुळं 10,700 कोटींचं नुकसान

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमधील स्थिरता तेल कंपन्यांसाठी अडचणीची ठरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमधील स्थिरता तेल कंपन्यांसाठी अडचणीची ठरत आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतीमधील स्थिरता तेल कंपन्यांसाठी (Oil Companies) अडचणीची ठरत आहे. अलीकडंच आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. मात्र, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. एका अहवालात म्हटलंय की, कमी किमतीत इंधनाची विक्री केल्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना जून तिमाहीत 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं (ICICI Securities) सोमवारी जारी केलेल्या आपल्या अहवालात म्हटलंय की, एप्रिल-जून तिमाहीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. परंतु, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. त्यामुळं तेल कंपन्यांचं विपणन स्तरावर मोठं नुकसान झालंय. यामुळं चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांना एकत्रितपणे सुमारे 10,700 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

या अहवालात पुढं म्हटलंय, दरात बदल न केल्यामुळं कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर 12 ते 14 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळं एकूण रिफाइनिंग मार्जिन (GRMs) 17 ते 18 प्रति बॅरलवर मजबूत राहतील, अशी अपेक्षा आहे. मार्केटिंग व्हॉल्यूममध्ये 17 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचं पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीवर 90 टक्के नियंत्रण आहे. IOC, BPCL आणि HPCL च्या स्वतःच्या रिफायनरी आहेत, जिथं कच्चं तेल पेट्रोल आणि डिझेलमध्ये बदललं जातं. कच्च्या तेलाचं इंधनात रूपांतर करण्याचं मार्जिन जास्त असलं तरी, स्थिर इंधनाच्या किमतीमुळं कंपन्यांचं नुकसान होत आहे. अहवालानुसार, किरकोळ विक्रीतील मोठ्या तोट्यामुळं चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जूनच्या पहिल्या तिमाहीत करपूर्व कमाईच्या (EBITDA) बाबतीत 6,600 कोटी रुपयांचा तोटा होईल.

तूर्तास, सोमवारीही देशातील प्रमुख शहरांमध्ये तेलाचे दर स्थिर राहिले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर कायम आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपयांना विकलं जात आहे. याशिवाय, चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर इथं पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना विकलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT