Farmer  File Photo
अर्थविश्व

खूशखबर! 15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येणार

सकाळ डिजिटल टीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील, तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात येणार आहेत. त्यामुळे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्यातील 2,000 ट्रान्सफर होतील.

मगील वर्षी 25 डिसेंबरला केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.

'या' शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळणार

ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. मात्र, ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल, ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.

कसं चेक करणार?

तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा

1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.

3. शेतकरी कॉर्नर यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.

5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT