pm modi on how to convert digital currency in cash  sakal
अर्थविश्व

डिजिटल रुपया रोखमध्ये कसा बदलायचा?, PM मोदींनी केलं स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज देशातील जनतेला संबोधित केले. सध्या कोरोना महामारीने जगासमोर आव्हाने आहेत. कोरोनापूर्वी जसं जग होतं तसं आता राहणार आहे. देशाचा डिजिटल रुपया कसा असेल? याबाबत चर्चा होत आहे. हा डिजिटल रुपया (Digital Currency) रोख रकमेत बदलता येईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनाबाबतही बरीच चर्चा होत आहे. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. हा डिजिटल रुपया सध्याच्या आपल्या चलनाप्रमाणेच असेल. यावर आरबीआय लक्ष ठेवणार आहे. ही अशी व्यवस्था असेल, ज्याला फिजिकल करन्सीसोबत बदलता येईल. जसं की तुम्हाला कोणी डिजिटल चलनामध्ये पैसे देत असेल तर तुम्ही त्याला रोख स्वरुपात बदलू शकता. यामुळे डिजिटल पेमेंट, ऑनलाइन पेमेंट, रिटेल पेमेंट अधिक सुरक्षित होईल. कुठलीही जोखीम असणार नाही. हा डिजिटल रुपयामुळे फिनटेक क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध होतील. यामुळे रोख रक्कम छापणे, त्याची हाताळणी आणि वितरणावरील भार कमी होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताने कोरोनाच्या संकटाचा तत्परतेने सामना केला आहे. त्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारताला अजून मजबूत बनावे, अशी जगाची अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या देशाची वाटचाल वेगाने करणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. नवीन संधीचे सोन करण्याची हीच वेळ आहे. स्वावलंबी बनण्याची हीच वेळ आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT