तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी
जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. PNB ने सोमवार, 4 एप्रिल 2022 पासून (Positive Pay system- PPS) लागू केली आहे. PNBने दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिलपासून चेक पेमेंटसाठी व्हेरिफिकेशन आवश्यक असणार आहे.(PNB Latest News)
बँकेने सोशल मीडियावर दिली माहिती
PNB ने कू अॅपवरील आपल्या अधिकृत खात्याद्वारे म्हटले आहे की, "4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे प्रणाली अनिवार्य असेल" ग्राहकांनी बँक शाखा किंवा डिजिटल चॅनेलद्वारे 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे चेक दिल्यास PPS कन्फर्मेशन बंधनकारक असेल. ग्राहकांना खाते क्रमांक, चेक नंबर, अल्फा, चेक डेट, चेक अमाउंट आणि बेनिफिशियरी नाव द्यावे लागेल."
अधिक माहितीसाठी PNBचे ग्राहक या क्रमांकावर 1800-103-2222 किंवा 1800-180-2222 या क्रमांकावर कॉल करू शकतात. किंवा तुम्ही बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
पॉझिटिव्ह पे सिस्टिम म्हणजे काय?
पॉझिटिव्ह पे सिस्टम हे एक प्रकारे फसवणूक पकडण्याचे एक साधन आहे. या सिस्टिमअंतर्गत, जेव्हा कोणी धनादेश वटेल तेव्हा त्याला संपूर्ण तपशील आपल्या बँकेला द्यावा लागेल. यामध्ये चेक जारी करणाऱ्यास चेकची तारीख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक, एकूण रक्कम व इतर आवश्यक माहिती एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे बँकेला द्यावी लागणार आहे. या सिस्टिममुळे जिथे चेकने पेमेंट सुरक्षित राहील, तिथे क्लिअरन्सलाही कमी वेळ लागणार आहे. त्यात दिलेला फिजिकल चेक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवावा लागत नाही. ही एक सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.