PNB bank  sakal
अर्थविश्व

नाहीतर खाते बंद करणार.....पीएनबीचा खातेधारकांना इशारा

बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पंजाब नॅशनल बँकेत (Panjab National Bank) खाते असल्यास आणि तुम्ही त्याचे केवायसी केले नसेल, तर ते काम 12 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करा. तुमचे बँक खाते चालू ठेवण्यासाठी तुम्ही वेळेत केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा, तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही कोणतेही व्यवहार तुमच्या खात्यावरून करू शकणार नाहीत.

पंजाब नॅशनल बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या ग्राहकांचे केवायसी झाले नाही, त्यांच्या पत्त्यावर दोन नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि या संदर्भातील माहिती मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे. बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची सूचनाही शेअर केली होती.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

तुमचे पंजाब नॅशनल बँकेचे केवायसी झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करावा लागेल. बँकेने म्हटले आहे की, ग्राहक ग्राहक सेवा क्रमांक 18001802222 किंवा 18001032222 वर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकतात. हे दोन्ही नंबर टोल फ्री आहेत.

बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी केला आहे

नो युवर कस्टमर (KYC) करून घेण्यासाठी बँक ग्राहकांना अलर्ट करत आहे. केवायसी करून घेतल्याने, ग्राहकांचे बँक खाते सक्रिय राहील आणि ते घरबसल्या सहजपणे व्यवहार करू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. बँकेने एका ट्विटद्वारे सांगितले की, सर्व ग्राहकांना 12 डिसेंबर 2022 पर्यंत केवायसी करण्यास सांगितले आहे.

केवायसी कसे करता येईल?

केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्त्याचा पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. ई-मेल पाठवूनही ग्राहक हे काम पूर्ण करू शकतात. तसेच, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या वतीने कोणत्याही खातेधारकाला कॉल केला जात नसल्याचे बँकेने सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉलबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

केवायसी का आवश्यक आहे?

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा KYC अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षां नंतर KYC अपडेट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT