मुंबई : मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांच्या (Housing Society) स्वयंपुनर्विकासाचे स्वप्न (Dream) आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुंबई बँकेवर (Mumbai Bank) लादलेले निर्बंध उठण्याची शक्यता असल्याचे अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले. ( Pravin darekar says Mumbai bank restrictions may remove - nss91)
मुंबई बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास योजना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही कारणास्तव थांबिवली होती. परंतु यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची भेट घेऊन त्यांच्याकडे या योजनेचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आरबीआयच्या यांसदर्भातील शंका दूर होऊन पुन्हा एकदा स्वयंपुर्विकास योजना लवकरच सुरू होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
दरेकर यांच्याहस्ते शनिवारी मुंबई जिल्हा को-ऑप. हौसिंग फेडरेशनच्या चारकोप येथील विक्री उपकेंद्राचे उद्घाटन झाले. या उपकेंद्रामधून स्टेशनरीची विक्री केली जाणार आहे. संस्थासाठी असणारे आवश्यक बायलॉज, शासकीय निर्णय, कायद्याची पुस्तके आदी आवश्यक दस्तऐवज या ठिकाणी उपलब्ध होतील. आतापर्यंत या सर्व गोष्टी फोर्ट येथील फेडरशनच्या कार्यालयात उपलब्ध व्हायच्या. आता त्या चारकोपला मिळणार असल्याने लोकांचा त्रास वाचेल. त्याशिवाय याविषयी प्रशिक्षण देण्याचे कामही ऑनलाइन आणि प्रत्यक्षपणेही या ठिकाणी होणार आहे.
मुंबई जिल्हा बँकेतर्फे राबविण्यात आलेली गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास योजना सध्या स्थगित आहे. यांसदर्भात आरबीआयच्या गव्हर्नरकडे पाठपुरावा करून येणाऱ्या एक-दोन महिन्याच्या कालावधीत ही योजना पूर्णत्वास नेली जाईल. उपनगरातही स्वयंपुनर्विकास योजनांचे अनेक प्रस्ताव आलेले आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. गृहनिर्माण सोसायटी सदस्यांसाठी आरोग्य सुविधा आम्ही या नवीन केंद्राच्या माध्यमातून देऊ शकतो. निवृत्त झालेले जेष्ठ नागरिक हाऊसिंग सोसायटीचा कारभार हाकत असतात. अशा वेळेला त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबई जिल्हा बँक, जिल्हा बँकेचे फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्था यातून सभासदांच्या हितासाठी आरोग्यविषयक योजना आणता येते का, याचाही विचार सुरू आहे. अशा प्रकारचे उपकेंद्र पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहरामध्ये सुरू करता येईल. या उपकेंद्रातून ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.