Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

याशिवाय एफआयआयकडून पुन्हा खरेदी सुरू झाल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

जुलैमध्ये घाऊक महागाई दरात घट झाल्याने बाजारातील भावनांना चालना मिळाली. मंगळवारी बाजारात मेटल आणि पीएसयू बँका वगळता सर्वच क्षेत्रात खरेदी दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स 379.43 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 59,842.21 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 127.10 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 17,825.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी बाजार तेजीत राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. चांगले जागतिक संकेत आणि सकारात्मक देशांतर्गत घटकांनी बाजारातील तेजीला सपोर्ट केला. महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीला लगाम घालण्याची आशा निर्माण केली आहे. याशिवाय एफआयआयकडून पुन्हा खरेदी सुरू झाल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

आता 17750 ची पातळी निफ्टीसाठी ट्रेंड डिसायडर असेल. जर निफ्टी 17750 ची पातळी तोडून वर गेला तर आपल्याला 17900-17925 ची पातळी पाहायला मिळेल. दुसरीकडे, जर निफ्टी 17750 च्या खाली घसरला तर त्यात 17700-17650 ची पातळी दिसू शकते.

निफ्टीने देली चार्टवर फॉलिंग ट्रेंड लाइन ब्रेकआउट दिल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. मोमेंटम ऑसिलेटर RSI ओव्हरबॉट झोनमध्ये आहे पण कोणताही मंदीचा क्रॉसओव्हर दिसत नाही. जोपर्यंत निफ्टी घसरणीच्या ट्रेंडलाइनवर राहील तोपर्यंत तो तेजीत राहील. दुसरीकडे, जर ते या ट्रेंडलाइनच्या खाली गेले तर त्यात नफा-बुकिंग दिसून येईल. खाली, निफ्टीला 17700 च्या दिशेने सपोर्ट आहे. त्याच वेळी, रझिस्टेंस 18000 वर दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

बीपीसीएल (BPCL)

मारुती (MARUTI)

हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

एमआरएफ (MRF)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

लॉरस लॅब (LAURUSLABS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT