सोमवारी बाजारात प्रॉफीट बुकिंग झाल्याने बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 519 अंकांनी घसरून 61145 वर आणि निफ्टी 148 अंकांनी घसरून 18160 वर बंद झाला. दुसरीकडे, मिडकॅप शेअर्समध्ये खालच्या पातळीवरून रिकव्हरी दिसून आली.
आयटी, एनर्जी, रियल्टी शेअर्समध्ये विक्री झाली. मेटल, ऑटो, फार्मा शेअर्सवरही दबाव होता. मिडकॅप शेअर्स खालच्या पातळीवरून सावरले. पीएसयू बँकांमध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 519 अंकांनी घसरून 61145 वर बंद झाला. निफ्टी 148 अंकांनी घसरून 18,160 वर बंद झाला. निफ्टी बँक 91 अंकांनी घसरून 42347 वर बंद झाला. मिडकॅप 15 अंकांनी घसरून 30902 वर बंद झाला
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टी कमकुवत जागतिक संकेतांमुळे घसरणीसह सुरू झाला आणि दिवसभर साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खाली निफ्टी 18100 च्या आधीच्या स्विंग हायच्या दिशेने सरकताना दिसला.
डेली टाइमफ्रेमवर राउंडिंग टॉप फॉर्मेशनसह आता बाजाराचा कल कमजोर दिसत असल्याचे ते म्हणाले. आरएसआयमधील बियरीश क्रॉसओव्हर तसेच नकारात्मक डायव्हर्जन बाजारात आणखी कमजोरी दर्शवते असेही ते म्हणाले.
पुढे जाऊन निफ्टीला पहिला सपोर्ट 18100 वर दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर ही घसरण 17750 पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, निफ्टीसाठी 18200 आणि 18400 वर रझिस्टंस दिसत आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
टेक महिन्द्रा (TECHM)
हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCO)
हिन्दाल्को (HINDALCO)
रिलायन्स (RELIANCE)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारत फोर्ज (BHARATFORG)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.