Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतीय चलनाची आताची स्थिती पाहता FII भारतात नफा कमावताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले.

शिल्पा गुजर

मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी फ्लॅट बंद झाले. सेन्सेक्स 16 अंकांनी 53077 वर तर निफ्टी 18 अंकांनी वर चढून 15850 वर बंद झाला. मेटल, ऑटो, एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. त्याचवेळी बँकिंग, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता. निफ्टी बँक 169 अंकांनी घसरून 33,642 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 78 अंकांनी वाढून 26,791 वर बंद झाला आहे. निफ्टीच्या 50 पैकी 30 शेअर्सची खरेदी झाली. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्समध्ये घसरण झाली. (pre analysis of share market update 29 june 2022)


युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतीय चलनाची आताची स्थिती पाहता FII भारतात नफा कमावताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. पण यापैकी कोणत्याही बाबतीत काही बदल झाले तर परिस्थिती आणखी बदललेली दिसून येईल.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

सुरुवातीच्या विक्रीनंतर निफ्टीने 15,700 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि त्यानंतर त्यात चांगला बाउन्स बॅक पाहायला मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. डेली चार्टवर एक लहान बुलिश कँडल केला आहे. जोपर्यंत निफ्टी 15,750 वर राहील तोपर्यंत तो तेजीत राहील आणि तो 15,950 आणि 16,000 पातळीही पाहू शकेल. दुसरीकडे, जर निफ्टी 15,750 च्या पातळीच्या खाली घसरला तर आपण यामध्ये 15,700-15,650 ची पातळी पाहू शकतो. निफ्टीमध्ये ग्रीन कँडल फॉर्मेशनसह बंद होण्यापूर्वी बरीच अस्थिरता पाहिल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आता नजीकच्या काळात, निफ्टीला 15,650 आणि 15,700 वर सपोर्ट दिसत आहे. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय तेजीच्या क्रॉस ओव्हरमध्ये आहे आणि यात वाढ होताना दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी 15,650 च्या वर राहील तोपर्यंत पॉझिटिव्ह ट्रेंड राहील. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 15,900 आणि 16,000 वर रझिस्टंस दिसून येतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ओनएनजीसी (ONGC)

हिन्दाल्को (HINDALCO)

कोल इंडिया (COALINDIA)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

टेक एम (TECHM)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ट्रेंट (TRENT)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

भारत फोर्ज (BHARATFORG)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT