सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी अतिशय अस्थिर राहिला. सेन्सेक्स 33.90 अंकांनी अर्थात 0.05% घसरून 62,834.60 वर बंद झाला. तर निफ्टी 4.90 अंकांनी अर्थात 0.03% वाढून 18,701 वर बंद झाला. सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकल्यास निफ्टी ऑटो, एनर्जी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फार्मामध्ये विक्री दिसून आली. तर पीएसयू बँक आणि मेटल इंडेक्समध्ये 1 टक्क्यांहून तेजी दिसली.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
जागतिक बाजारपेठेतून नवीन ट्रिगर नसल्यामुळे निराशा निर्माण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बहुतांश आशियाई इंडेक्स घसरणीवर बंद झाले. या आठवड्यात आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध दिसले.
निफ्टीमधील 18,600 ची पातळी महत्त्वपूर्ण सपोर्ट झोन म्हणून काम करू शकते असे श्रीकांत म्हणाले. निफ्टीने याच्यावर व्यवहार केल्यास भविष्यात तो पुन्हा 18,800-18,850 च्या पातळीवर जाऊ शकतो. दुसरीकडे, जर तो 18,600 च्या खाली घसरला तर निफ्टी 18,500-18,450 पर्यंत घसरेल.
बाजाराने आठवड्याची सुरुवात फारशी चांगली केली नसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. फ्लॅट ओपनिंगनंतर निफ्टी एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला. बाजाराचा शेवट 18,701 वर बंद झाला.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
रिलायन्स (RELIANCE)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
टेक महिन्द्रा (TECHM)
ब्रिटानिया (BRITANNIA)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
भारत फोर्ज (BHARATFORG)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.