Privatisation News in India : केंद्र सरकारने आणखी एका कंपनीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया जानेवारीत सुरू होईल, असे नियोजन सरकारने गेल्या वर्षीच केले होते.
सरकारने CONCOR (concor privatization ) चे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या महिन्यातच निविदा मागवल्या आहेत.
सरकार या महिन्यात कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (concor) च्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक बोली (EoI) आमंत्रित करेल.
सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिका-याने सांगितले की, CONCOR साठीचे कागदपत्रे जवळजवळ तयार आहेत. मंत्रिमंडळाच्या प्रमुख मंत्र्यांच्या गटाकडून मंजुरी घ्यावी लागेल.
हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
लवकरच निवेदन प्रसिद्ध केले जाईल
अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही शक्य तितक्या लवकर CONCOR साठी EOI आमंत्रित करणार आहोत. नोव्हेंबर 2019 मध्ये, मंत्रिमंडळाने सरकारच्या 54.80 टक्के समभागांपैकी CONCOR मधील 30.8 टक्के समभाग विक्रीला मंजुरी दिली होती.
यासोबतच हिस्सेदारी घेणार्या कंपनीवर व्यवस्थापन नियंत्रणही दिले जाणार आहे. या विक्रीनंतर, सरकार कोणत्याही व्हेटो पॉवरशिवाय 24 टक्के हिस्सेदारी राखून ठेवेल.
पुढील आर्थिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे
केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबरमध्ये सुधारित धोरणाला मंजुरी दिली. ज्यात मालवाहतूक-संबंधित कामांसाठी रेल्वेची जमीन जमिनीच्या बाजार मूल्याच्या 1.5 टक्के वार्षिक दराने 35 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची तरतूद आहे.
CONCOR ची धोरणात्मक विक्री पुढील आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहील, जेव्हा संभाव्य गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक बोली सादर करतील.
छोट्या कंपन्यांची विक्री करून निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठले जाईल
निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्चमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात यापुढे धोरणात्मक भागविक्री अपेक्षित नाही.
अशा परिस्थितीत 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार अल्प भागभांडवल विकण्याचा आग्रह धरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.