शेअर बाजारात नफा बुकींगमुळे घसरण esakal
अर्थविश्व

Share Market: आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर?

बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक विक्री झाले.

सकाऴ वृत्तसेवा

निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी सेन्सेक्सचे 30 पैकी 28 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्स घसरले.

- शिल्पा गुजर

शेअर बाजाराने बुधवारी नफ्यासह सुरुवात खरी पण दिवस संपता संपता चित्र बदलले. बुधवारी नफा-बुकिंगचे बाजारात वर्चस्व राहिले आणि सेन्सेक्स-निफ्टी लाल मार्काने अर्थात घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 555 अंकांनी घसरून 59,190 अंकांवर तर निफ्टी 176 अंकांनी घसरून 17,646 वर बंद झाला. बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक विक्री झाले. मेटल, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय, ऑटो, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ग्राहक टिकाऊ स्टॉकमध्येही विक्री दिसून आली. बुधवारी निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी, सेन्सेक्सचे 30 पैकी 28 शेअर्स घसरणीवर बंद झाले. निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी सेन्सेक्सचे 30 पैकी 28 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्स घसरले.

तांत्रिक दृष्टिकोन (Technical View)

निफ्टीने डेली स्केलवर bearish engulfing candle अर्थात मंदी दर्शवणारा ग्राफ तयार केला आहे. आता निफ्टीला 17,777 आणि 17,900 च्या दिशेने जायचे असेल तर ते 17,700 च्या वर राहावे लागेल असे मोतीलाल ओसवाल फायनान्सचे चंदन तापडिया म्हणाले. तर खाली 17,780 आणि 17,450 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत असल्याचेही ते म्हणाले.

निफ्टी बुधवारी सुरुवातीपासून दबावाखाली होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे यांनी सांगितले. सलग दोन बुलिश कँडल अर्थात तेजीच्या ग्राफनंतर मंदीचा ग्राफ तयार केलाय. निफ्टीने आपला मोठा सपोर्ट झोनही मोडला आहे आणि आता त्याचा पुढचा सपोर्ट 17,600-17,500 च्या जवळ दिसत असल्याचे रोहित सिंगरे म्हणाले.

बुधवारच्या दिवसाचा व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 555.15 अर्थात 0.93 टक्क्यांनी घसरून 59,189.73 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 193.50 अर्थात 1.09 टक्क्यांनी खाली17,628.80 वर बंद झाला.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

- व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea)

- टाटा पॉवर (Tata Power)

- ओएनजीसी (ONGC)

- पीएनबी (PNB)

- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)

- भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड (BHEL)

- कोल इंडिया (Coal India)

- बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)

- गेल इंडिया लिमिटेड (GAIL)

- इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (Indiabulls hsg)

नोंद : क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT