Upswing  Sakal
अर्थविश्व

डेटा विश्लेषणातून पर्यटन व हाॅटेल व्यवसाय अनलाॅक करून देणारी स्टार्टअप अपस्विंग

सलील उरुणकर

कोव्हिड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या पहिल्या, दुसऱ्या (व आता संभाव्य) तिसऱ्या लाॅकडाऊनमध्ये सर्वात मोठा फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे हाॅस्पिटॅलिटी. लाॅकडाऊनमुळे प्रवासावर आलेल्या निर्बंधांमुळे पर्यटनस्थळी व मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या हाॅटेल व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. अशा कठीण काळात या क्षेत्राला जर कोणी आधार देऊ शकेल तर ते म्हणजे फक्त पर्यटक किंवा ग्राहक. पण हे ग्राहक आपल्याकडे खेचायचे कसे, त्यांचा विश्वास कसा संपादन करायचा किंवा त्यांच्यासाठी कोणत्या आकर्षक योजना जाहीर करायच्या हे पर्यटन व हाॅटेल व्यवसायातील अनेकांना समजत किंवा उमजत नाही. मात्र आता, हाॅटेलमध्ये कोव्हिड-पूर्व काळात येऊन गेलेल्या ग्राहकांविषयीचा डेटा कोणा व्यावसायिकाकडे उपलब्ध असेल तर त्याआधारे पुन्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अपस्विंग काॅग्निटिव्ह हाॅस्पिटॅलिटी सोल्यूशन्स (Upswing Cognitive Hospitality Solutions) ही स्टार्टअप मदत करू शकते.

हर्षवर्धन आमले आणि हर्ष माथूर हे दोघे या 'न्यू एज प्रेडिक्टिव्ह डेटा सोल्यूशन्स' (new-age predictive data solutions startup) स्टार्टअपचे संस्थापक आहेत. पूर्वी येऊन गेलेल्या ग्राहकांची पसंती कोणत्या गोष्टींना होती, का होती, त्यांची वर्तणूक आणि वैयक्तिक पातळीवरची आवड-निवड या माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटलिजन्स - एआय) आणि ब्लाॅकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून अपस्विंग ही स्टार्टअप हाॅटेल व अन्य हाॅस्पिटॅलिटी सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी मदत करत आहे.

औरंगाबादमधून हाॅटेल मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर हर्षवर्धनने मुंबईतून बिझनेस मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले. हाॅस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये सेल्स या क्षेत्रातून त्याने २००६ आपल्या करिअरला सुरवात केली. २००८ मध्ये हर्षवर्धन ‘आरएमएस - दी हाॅस्पिटॅलिटी क्लाऊड’ (RMS – The Hospitality Cloud) या कंपनीमध्ये नोकरीला लागला. हाॅटेल्सला साॅफ्टवेअर सोल्यूशन्स पुरवणारी ही जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी आहे. नोकरी सुरू झाल्यानंतर प्रोमोशन होत होत, हर्षवर्धन या कंपनीमध्ये भारतातील नॅशनल सेल्स हेड म्हणून काम करू लागला. जानेवारी २०२१ पर्यंत तो या पदावर होता, मात्र त्यानंतर त्याने अपस्विंग ही स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडून दिली. हर्ष माथूर हा फक्त तीन वर्ष नोकरीचा अनुभव असलेला साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. तीन वर्षातच नोकरीला कंटाळलेल्या हर्षने बिग डेटा टेक्नाॅलाॅजीच्या आधारे काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा निश्चय केला आणि हर्षवर्धन आमलेच्या सोबत त्याने अपस्विंग स्टार्टअप स्थापन केली.

हर्षवर्धन म्हणाला, "हाॅस्पिटॅलिटी क्षेत्र असे होते की तिथे तंत्रज्ञान म्हटले की फक्त हाॅटेलच्या रूममधील तापमान रिमोटने नियंत्रित करणे किंवा फार फार तर चेक-ईन व बिलिंगसाठी साॅफ्टवेअर वापरणे एवढ्यापुरतेच मर्यादित होते. काही हाॅटेल्स हे त्यांच्या ग्राहकांविषयीची माहिती संकलित करून ठेवायचे मात्र त्याचे तंत्रज्ञानाधारे योग्य विश्लेषण होत नसत. नोकरीनिमित्त भारतासह संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया, मध्य-पूर्व भागात फिरताना ही बाब माझ्या निदर्शनास आली. त्यामुळे मी २०१४ पासून डेटा सायन्स, ब्लाॅकचेन, एआय या तंत्रज्ञानाविषयी अभ्यास सुरू केला. मी अभियंता नसलो तरी या तंत्रज्ञानातील संकल्पना मला समजायला मदत झाली. नंतर, २०१८ मध्ये मी माझ्या मित्रांबरोबर या संकल्पनेबाबत चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हाॅटेल्सला खरंच अशा सेवेची गरज आहे की नाही आणि असली तर त्याची व्याप्ती किती आहे याची चाचपणी आम्ही केली. २०१९ मध्ये आम्ही खऱ्या अर्थाने कोडिंगला सुरवात केली. ते करत असतानाच, स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी आरएमएससारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर कोणत्यातरी स्वरुपाची भागीदारी करणे उचित ठरेल असे आमचे मत होते. त्यामुळे त्या कंपनीच्या सहसंस्थापकाबरोबर आम्ही चर्चा केली आणि तेसुद्धा आम्हाला मदत करायला तयार झाले. मात्र त्यानंतर कोव्हिड-१९ महामारीचा उद्रेक झाला आणि काम थंडावले."

लाॅकडाऊनचा उपयोग आम्ही आमचे प्राॅडक्ट सुधारण्यासाठी केला. भारतातील हाॅटेल बंद असले तरी दुबईमधील हाॅटेल ९० टक्के क्षमतेने सुरू होते. त्यामुळे मी एका मित्राच्या मदतीने तेथील एका हाॅटेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्या हाॅटेलच्या १५ प्राॅपर्टी आहेत आणि त्यामुळे आम्हाला नव्याने डेटा मिळण्यास सुरवात झाली. याच धर्तीवर आम्ही आता दुबईतील अन्य हाॅटेल तसेच लंडनमधील हाॅटेल्सबरोबर चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, आरएमएस कंपनीचा माजी सीईओ जेरी काॅम्निनोस यांच्याशी मी संपर्क साधला. एकत्र काम केले असल्यामुळे आणि हाॅस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनुभव असल्यामुळे जेरी यांनी आमच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले. फ्रेम्ड व्हेन्चर कॅपिटल या आॅस्ट्रेलियन खासगी गुंतवणूकदार कंपनीने थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून अपस्विंगमध्ये दीड लाख अमेरिकन डाॅलर एवढ्या रकमेची गुंतवणूक केली आहे, असेही हर्षवर्धनने सांगितले.

अपस्विंगने सध्या दोन प्रकारची उत्पादने व सेवा उपलब्ध करून दिली आहेत. अपस्विंग ऑरा ही सेवा हाॅटेल व्यावसायिकांसाठी असून त्याद्वारे ग्राहकांच्या पसंत-नापसंतीची, त्यांच्या प्राधान्याची, खरेदीच्या सवयींची व अन्य माहिती आस्थापनांना उपलब्ध करून दिली जाते. तर अपस्विंग अल्वी या सेवेद्वारे अभ्यागतांना त्यांच्या हाॅटेलमधील वास्तव्याच्या कालावधीत सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींचे व्यवस्थापन करण्याची संधी दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT