QR Based Vending Machine: आज चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, मध्यवर्ती बँक QR-आधारित कॉईन व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू करणार आहे.
नाण्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात 12 शहरांमध्ये ही सेवा सुरू करणार आहे. या मशिन्सचा वापर यूपीआयच्या माध्यमातून केला जाईल आणि बँकेच्या नोटांऐवजी नाणी जारी केली जातील.
RBI गव्हर्नर यांनी 2023 च्या त्यांच्या पहिल्या आर्थिक भाषणात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही सलग सहावी वेळ आहे जेंव्हा RBI कडून रेपो दरात वाढ केली जात आहे. रेपो दर आता 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
त्यामुळे बँकांचे कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे आधीच कर्ज आहे त्यांच्यासाठी EMI महाग होणार आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत 6 पैकी 4 लोकांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले.
नाण्यांच्या वितरणाला चालना :
नाण्यांच्या वितरणाला चालना मिळावी आणि नाण्यांचा आवाका वाढावा या उद्देशाने ही यंत्रे सुरू करण्यात येणार असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. याअंतर्गत व्हेंडिंग मशीन बसवल्यानंतर एटीएम कार्डच्या जागी QR कोड वापरावा लागेल, ज्यामधून नाणी काढता येतील.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
नाणे विक्री मशीन :
गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, “भारतीय रिझर्व्ह बँक 12 शहरांमध्ये QR कोड आधारित कॉईन वेंडिंग मशीन (QCVM) वर पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ही व्हेंडिंग मशीन बँक नोटांऐवजी UPI वापरून ग्राहकाच्या खात्यातून डेबिट करून नाणी वितरीत करतील.
त्यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. या मशीन्सचा वापर करून नाण्यांच्या वितरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना निर्देश दिले जातील.''
रिटेल डिजिटल पेमेंट सिस्टम :
UPI ही देशातील सर्वात लोकप्रिय रिटेल डिजिटल पेमेंट प्रणाली बनली आहे, असेही ते म्हणाले. RBI आता भारतात येणार्या सर्व प्रवाशांना त्यांच्या देशात मुक्कामादरम्यान व्यापारी पेमेंटसाठी UPI वापरण्याची परवानगी देण्याचा विचार करेल.
ही सुविधा G-20 देशांतील प्रवाशांच्या निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येण्यापासून सुरू होईल. RBI गव्हर्नर म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या तीन वर्षांत अनेक मोठे धक्के यशस्वीपणे पेलले आहेत आणि ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.