credit cards 
अर्थविश्व

क्रेडिट कार्डवर बचत करायचीय? कॅशबॅक, डिस्काउंटद्वारे कशी करता येईल जाणून घ्या!

एकाच कार्डवर आपल्याला खरेदी, रेस्टॉरंट फूड, मनोरंजन यांसह इतर अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

सकाळ डिजिटल टीम

विविध बॅंकेची क्रेडिट कार्ड (Credit Card) ग्राहकाला वेगवेगळे फायदे देतात. एकाच कार्डवर आपल्याला खरेदी, रेस्टॉरंट फूड, मनोरंजन यांसह इतर अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

आजकाल क्रेडिट कार्ड असणे अतिशय महत्वाचे झाले आहे. आपल्या कंपनीचे क्रेडीट कार्ड (Credit Card) घ्यावे यासाठी अनेक कंपन्या फोन करून हैराण करतात. पण एकाच कार्डावर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करता येऊ शकतात. अशावेळी नेमकं कोणतं कार्ड वापरावं असा प्रश्न पडतो. विविध बॅंकेची (Bank) क्रेडीट कार्ड्स तुम्हाला वेगवेगळे फायदे देतात. तुम्हाला एकाच कार्डावर खरेदी, खाणं(Food), मनोरंजन (Entertainment) यासह इतर अनेक प्रकारचे फायदे वसूल करता येतात. त्यामुळे तुम्ही खरेदी तर करताच. पण बचतही करता. अनेक क्रेडिट कार्ड पर्यायांपैकी, विविध श्रेणींचे फायदे देणार्या क्रेडिट कार्डचा शोध घेणे महत्वाचे असते. ही काही क्रेडिट कार्ड तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतात.

एचडीएफसी क्रेडिट कार्ड (HDFC Regalia Credit Card)Credit Card

या कार्डवर 2,500 वार्षिक शुल्क रुपये आहे. या क्रेडिट कार्डवर विमा, युटिलीटी, शिक्षण आणि भाडे यावर 150 रुपयांच्या सर्व व्यवहारांसाठी 4 रिवॉर्ड पॉईंट मिळतील. हे उड्डाण तिकिटे, हॉटेल बुकिंग, व्हाउचर, भेटवस्तू आणि उत्पादने इत्यादींसाठी खर्च करता येईल. यात विमानतळ लाउंजमध्येही प्रवेश सामाविष्ट आहे. यात 12 भारतातील तर 6 परदेशातील ठिकाणांचा समावेश आहे.

एचडीफफसी डिनर क्लब क्रेडिट कार्ज (HDFC Dinners Club Credit Card)

या कार्डवर Amazon Prime, झोमॅटो प्रो, टाइम्स प्राइम, बिग बास्केट इत्यादींचे वार्षिक सदस्यत्व मिळते. हे कार्ड मोठ्या स्पा, सलून, जिम आणि वेलनेस रिट्रीटवर विशेष सूट देते. या कार्डवर वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

अॅक्सिस बॅंक एसीई क्रेडिट कार्ड (Axis Bank ACE Credit Card)

या क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला गुगल पेमधून युटिलिटी बिल पेमेंट करताना 5% कॅशबॅक मिळेल. हे स्विगी, झोमॅटो आणि ओलावर 4% कॅशबॅक देते. याशिवाय, इतर सर्व प्रकारच्या खर्चावर 2% फ्लॅट कॅशबॅकचा पर्याय तुम्हाला मिळतो. वर्षभरात खर्चावर कॅशबॅक मिळतोच, पण कार्डधारकांना भारतातील 400 हून अधिक भागीदार असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये 4 वेळा जाता येऊ शकते. तसेच 20% पर्यंत सूट मिळते. या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क 499 रुपये आहे.

स्टॅंडर्ड चार्टड डिजी स्मार्ट क्रेडिट कार्ड (Standard Chartered Digi Smart Credit Card)

हे कार्ड झोमॅटो ग्रॉफर्सवर 10 टक्के आणि झोमॅटोवर महिन्याला 5 व्यवहारांवर 10% सूट देते. मित्रां कार्डधारकाला खरेदीवर महिन्यातून एकदा 20% सूट मिळते, देशांतर्गत उड्डाण तिकिटे बुक करताना 20% सूट आणि तिमाहीत एकदा आंतरराष्ट्रीय उड्डाणे बुक करताना 10,000 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर 10% सूट मिळते. तसेच प्रवासादरम्यान देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर एका तिमाहीत एका व्यवहारासाठी 4,000 रुपयांपर्यंत सूट आणि इतर लाभ ही दिले जातात. या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क 588 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT