Income tax return 
अर्थविश्व

इन्कम टॅक्स रिटर्न कसे भराल?

रेखा धामणकर

प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरणे आवश्यक आहे का, असा प्रश्न सर्वसाधारणपणे अनेकांना पडतो. माझ्या मते हे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला कर्ज घेणे, व्हिसा काढणे या व अशा अनेक कारणांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र हा एक तुमच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा मानला जातो. सध्याच्या प्राप्तिकर कायद्यामध्ये उशिरा भरलेल्या विवरणपत्रासाठी दंड असल्याने आणि एक वर्षापेक्षा जास्त आधीचे विवरणपत्र दाखल करता येत नसल्याने त्या-त्या वर्षीच वेळेपूर्वी पूर्तता करणे फायदेशीर ठरू शकते. 

प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र दाखल करणे अत्यंत सोपे केले आहे. ज्यांचे उत्पन्न पगार/पेन्शन आणि व्याज या स्वरूपाचे आहे आणि ज्यांच्याकडे फक्त एकच घर आहे, तसेच ज्यांचे करपात्र उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी आहे (थोडक्यात, ज्यांना नमुना ITR-१ मध्ये विवरणपत्र भरायचे आहे) अशा व्यक्तींचा विचार करूया. येत्या ३१ डिसेंबर २०२० पर्यंत याची मुदत आहे. 

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्राथमिक तयारी
आपण प्रथमच ई-विवरणपत्र भरणार असल्यास, आपल्याला incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर आपले खाते उघडावे लागेल. यासाठी आपल्याला एक ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. आपला ‘पॅन’ आणि इतर माहिती टाकून आपण खाते उघडू शकता. खाते पडताळणी (verification) साठी आपल्या मोबाइल आणि ई-मेल वर दोन स्वतंत्र OTP येतील. हे दोन्ही OTP टाकून आपण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

विवरणपत्र भरण्याआधी...
सर्वप्रथम आपल्या सर्व बँक खात्यांची पासबुक/खातेउतारे, करकपातीची (TDS) प्रमाणपत्रे, ज्या गुंतवणुकीची/खर्चाची वजावट घ्यायची आहे, त्याची कागदपत्रे, गृहकर्जावरील व्याजाची वजावट घ्यायची असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि इतर काही उत्पन्न घोषित करायचे असल्यास त्याची कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच आपल्या ई-फायलिंग खात्यामध्ये जाऊन annual tax statement (26AS) डाउनलोड करून घ्यावे. यात आपल्या करखात्यावर जमा झालेला कर (TDS आणि आगाऊ कर) आपल्याजवळील पुराव्यानुसार तपासून घ्यावा. कर जमा असेल, पण प्रमाणपत्र नसेल, तर त्याची नोंद घ्यावी. तसेच करकपात न झालेले (15G/ 15H फॉर्म दिल्यामुळे) उत्पन्न दाखवले असेल, तर त्याचीही नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त या वर्षीपासून आपल्या काही इतर व्यवहारांची माहितीही यात दिली गेली आहे. उदा. मालमत्ता विक्रीवरील करकपात, मोठ्या गुंतवणुकीचे व्यवहार आदी व्यवहार दिसत असतील आणि त्यातून करपात्र उत्पन्न निर्माण होत असल्यास आपल्याला ITR-१ नमुन्यात विवरणपत्र भरता येणार आहे का, याची पुनर्तपासणी करावी आणि मगच योग्य पर्याय निवडावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विवरणपत्र भरण्याचे दोन पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत- ऑनलाइन भरणे किंवा एक्सेल/जावा प्रणालीमध्ये तयार करून अपलोड करणे.

विवरणपत्राचे e-verification  
ऑनलाइन विवरणपत्र भरताना ते तुम्हीच भरत आहात, याची खातरजमा करण्यासाठी e-verification आवश्यक आहे. पूर्वी हे आपल्या सहीमुळे शक्य होते. मात्र, ऑनलाइनच्या जमान्यात आता या सहीची जागा ही e-verification ने घेतली आहे. आपण आपले विवरणपत्र e-verify केले, तर आपल्याला पुढे कोणतेही कागदपत्र प्राप्तिकर विभागाकडे पाठवायची आवश्यकता नाही. यासाठी आपल्याला खालील पर्याय उपलब्ध आहेत-

आधार OTP ः यात आपल्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या मोबाइलवर OTP पाठविला जाईल. तो टाकून आपण आपले विवरणपत्र e-verify करू शकता. हा सर्वांत सोपा आणि जास्त वापरला जाणारा पर्याय आहे.

नेटबँकिंगद्वारे ः यासाठी आपल्याकडे नेटबँकिंग सुविधा असणे आवश्यक आहे. आपले विवरणपत्र आपण e-verify न करता अपलोड करु शकता आणि नंतर आपल्या नेटबँकिंग खात्यात log-in करून Income-tax efiling चा पर्याय निवडा. आपल्या e-verify न केलेल्या विवरणपत्राची माहिती दिसेल, त्यापुढील e-verify पर्याय निवडून आपल्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाइलवर आलेला OTP टाकून e-verification पूर्ण करा.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एटीएम मशिनद्वारे ः हो! आपण आपले विवरणपत्र ‘एटीएम’द्वारे देखील e-verify करू शकता. काही निवडक बँकांच्या ‘एटीएम’वर ही सुविधा उपलब्ध आहे. 

बँक किंवा डी-मॅट खात्याच्या आधारे ः काही निवडक बँका आणि NSDL आणि CDSL कडील डी-मॅट खात्याच्या आधारेही e-verification पूर्ण करता येते.

विवरणपत्र भरताना...  
आपण ऑनलाइन फायलिंगचा पर्याय निवडला असल्यास, आपली प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेली बरीच माहिती (करकपात आणि आगाऊ करसुद्धा!) आपोआप भरली जाईल. यात बदल करण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध असेल. मात्र, यात बदल करण्याआधी तो खरोखरच आवश्यक आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्या. अन्यथा नंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. माहिती भरत असताना वेळोवेळी आपली माहिती ‘सेव्ह’ करायला विसरू नका. तसेच अखेरीस ‘सबमिट’ करण्यापूर्वी आपले उत्पन्न आणि करदायित्व/परतावा तपासून घ्या आणि पूर्ण खात्री झाल्यावरच ‘सबमिट’ करा.

आपण एक्सेल किंवा जावा प्रणाली वापरून विवरणपत्र भरणार असल्यास, pre-filled xml फाईल उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या खात्यामध्ये log-in करून My Account विभागातून आपण ही xml डाउनलोड करून घेऊ शकता व आपल्या प्रणालीमध्ये प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेली आपली माहिती आपोआप भरू शकता. यात आपला ‘पॅन’, नाव, जन्मतारीख, पत्ता याबरोबरच करकपातीची आणि आगाऊ कराची माहितीही भरली जाईल. म्हणजेच ही माहिती भरण्याचे आपले कष्ट वाचतील आणि शिवाय माहिती भरताना होणाऱ्या चुकाही आपण टाळू शकाल! 

यानंतर आपल्याला जी अतिरिक्त माहिती भरायची आहे किंवा जे बदल करायचे असतील, ते आपण करू शकता. माहिती पूर्ण भरून झाल्यावर आपल्याला आपण भरलेल्या माहितीत काही तांत्रिक चुका नाहीत ना, हे देखील तपासता येते आणि ही तपासणी पूर्ण झाल्यावरच आपली विवरणपत्राची xml फाईल तयार होते. म्हणजेच आपण भरलेले विवरणपत्र बहुतांशी बरोबरच असणार, याची आपण खात्री बाळगू शकता. आपली xml फाईल तयार झाल्यावर आपल्याला ती अपलोड करावी लागणार आहे. 

आहे की नाही हे सोपे! शिवाय हे सर्व आपण स्वतः करू शकता! काही अडचण आलीच तर e-filing पोर्टलवर; तसेच यू-ट्यूबवरही भरपूर माहिती उपलब्ध आहे. 

(लेखिका चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT