Inflation 
अर्थविश्व

तीन महिन्यांच्या तुलनेत जुलैमध्ये किरकोळ महागाईत घट

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : यावर्षी जुलै महिन्यात किरकोळ महागाईमध्ये (Retail inflation) घट झाली जी ५.५९ टक्के आहे. जून महिन्याच्या तुलनेत यामध्ये ०.६७ टक्के घट झाली आहे. जून २०२१मध्ये महागाईचा दर ६.२६ टक्के होता तर गेल्या वर्षी जुलैमध्ये तो ६.७३ टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं गुरुवारी ही माहिती दिली.

गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच जुलै महिन्यात किरकोळ महागाईत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा किरकोळ महागाईचा दर हा भारतीय रिझर्व्ह बँकेने ६ टक्के इतक्या निश्चित केलेल्या मर्यादेच्या आतामध्ये आला आहे. जो यापूर्वीच सलग दोन महिन्यांत ६ टक्क्यांहून अधिक होता.

कारखाना उत्पादनात घट

त्याचबरोबर जूनमध्ये कारखाना उत्पादनात मे महिन्याच्या तुलनेत २९.३ टक्क्यांहून घट होत १३.६ टक्के नोंदवलं गेलं आहे. सरकारी आकड्यांनुसार, ही घट खाद्य पदार्थांच्या किंमतींमध्ये घट आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यात आल्यामुळं झाली आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई दोन टक्के मार्जिनसह चार टक्क्यांवर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

खाद्य निर्देशांकात घट

दरम्यान, जुलै २०२१ मध्ये जेवणाचं ताटही स्वस्त झालं आहे. ग्राहक खाद्य मूल्य निर्देशांक जुलै महिन्यात ३.९६ टक्क्यांवर राहिला. जून महिन्यात हा दर ५.१५ टक्के होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या एका सर्वेक्षणात अर्थतज्ज्ञांनी जुलै मधील किरकोळ महागाईचा दर ५.७८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जून महिन्यात खाण उत्पादनात २३.१ आणि वीज उत्पादनात ८.३ टक्के वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT