RIL RIL
अर्थविश्व

RIL कंपनी ADNOC सोबतच्या करारानंतर गुंतवणार दीड अब्ज डॉलर?

RIL आणि ADNOC मध्ये दीड वर्षांपुर्वीच करारानंतर या संयुक्त उपक्रमावर सह्या झाल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे

प्रमोद सरवळे

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. युएईची सरकारी तेल कंपनी अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीसोबत (Abu Dhabi National Oil Company-ADNOC) पेट्रोकेमिकलच्या संयुक्त उद्योग सुरू करण्याची शक्यता आहे. यामध्ये आरआयएल 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

RIL आणि ADNOC मध्ये दीड वर्षांपुर्वीच करारानंतर या संयुक्त उपक्रमावर सह्या झाल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे. रिलाइन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीसोबत केलेल्या करारात जवळपास दीड अब्ज डॉलर गुंतवले आहेत.

रुवाईसमधील या प्रकल्पात रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स कारखान्यात इथिलीन डायक्लोराईड (ethylene dichloride-EDC) तयार करण्यासाठी आरआयएलने ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आरआयएलप्रमाणेच ADNOC कंपनीदेखील संयुक्त उद्यमात अशीच गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात दोन्ही कंपन्या नवीन करार घोषित करण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. आरआयएल त्यांचे आंतरराष्ट्रीय उद्योगाचे प्रमुख स्थान म्हणून आखाती देशातील गुंतवणुकीकडे पाहत आहे. तसेच तिथली कररचनाही बरीच उदार असल्याने मुंकेश अंबांनीनी आखाती देशातील पेट्रोकेमीकल्स कंपनीत गुंतवणूक पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT