- : शिल्पा गुजर
शेअर बाजार ही अशी जागा आहे, जिथे तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात पण तुमचे पैसे बुडण्याचा धोकाही असतो. इथे गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी 2 सर्वोत्तम शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
रूपा आणि कंपनीबद्दल तज्ज्ञांचे मत
विकास सेठी यांनी रूपा अँड कंपनीचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला दिला आहे. ही एक होजरी आणि वस्त्र निर्मिती कंपनी आहे. रूपा फ्रंटलाइन, मॅक्रोमन, युरो हे या कंपनीचे लोकप्रिय ब्रँड आहेत. रणवीर सिंग कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहे.
कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन (OPM) 19 टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी (RoE) 24 टक्के आहे. त्याच वेळी, कॅपिटल एम्प्लॉइड परतावा (ROCE) 32 टक्के आहे. त्याचे शेअर्स स्वस्त आहेत. हे 20 च्या पीई मल्टिपलवर काम करत आहे. त्याचे कर्ज ते इक्विटी प्रमाण (डी/ई) 0.19 टक्के आहे. प्रवर्तकांकडे कंपनीमध्ये 73% हिस्सा आहे.
रूपा अँड कंपनी (Rupa and Company)
सीएमपी (CMP) - 472.75 रुपये
लक्ष्य (Target) - 485 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 450 रुपये
गॅब्रिएल इंडिया(Gabriel India)
ही ऑटो कंपोनंट्सची कंपनी आहे. सरकार ज्या प्रकारे वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असे म्हणता येईल. सरकार EV (इलेक्ट्रिक व्हेहीकल) सेक्टरवरही लक्ष केंद्रित करत आहे आणि ही कंपनी EV बद्दल खूप गंभीर आहे.
कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. जून तिमाहीत त्याचा 12 कोटींचा पीएटी (Profit After Tax) होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचे 23 कोटींचे नुकसान झाले होते. एफआयआय आणि डीआयआयचाही यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड देखील याबाबत पॉझिटीव्ह आहे. गॅब्रिएल इंडियामध्ये त्यांचा 7.04 टक्के हिस्सा आहे. शिवाय एचडीएफसीने या तिमाहीतही आपला हिस्सा वाढवला आहे.
गॅब्रिएल इंडिया (Gabriel India)
सीएमपी (CMP) - 151.90 रुपये
लक्ष्य (Target) - 165 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 145 रुपये
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.