rupee and dollar Sakal
अर्थविश्व

रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वात निचांकी पातळीवर; जाणून घ्या नवा दर

सातत्यानं रुपयाच्या अवमुल्यनाची काय आहेत? कारणं जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रुपयाचं अवमुल्यन अद्यापही सुरुच असून आज (मंगळवार) पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरलं आहे. काल बाजार बंद झाला तेव्हाच रुपया निचांकी पातळीवर बंद झाला होता. (Rupee falls to lifetime low of 79.58 against US dollar)

देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचं बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. यापार्श्वभूमीवर इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये मंगळवारी रुपया १३ पैसे निचांकी पातळीवर खुला झाला. अर्थात रुपया डॉलरच्या तुलनेत ७९.५८ रुपयांपर्यंत घसरला आहे.

रुपया शुक्रवारी 79.25 मुल्यावर बंद झाला होता तुलनेत स्थानिक सत्रात रुपया प्रति डॉलर 79.43 वर बंद झाला. त्यानंतर रुपयानं युनिट सत्रादरम्यान 79.44 च्या आजीवन नीचांकी पातळीला स्पर्श केला, मागील आठवड्यात रुपया 79.3750च्या या नीचांकी पातळीवर होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या बुधवारी परदेशी गंगाजळी वाढावी यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती. ज्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना अल्प-मुदतीचे कॉर्पोरेट कर्ज खरेदी करण्याला परवानगी तसेच अधिक सरकारी सिक्युरिटीजचा समावेश याचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT