what is post office gram suraksha scheme esakal
अर्थविश्व

Best Saving Scheme: काय! फक्त ५० रूपये गुंतवा अन् मिळवा ३५ लाख, कसे ते वाचा

Gram Suraksha Scheme: हि फसवेगीरी नाही तर भारत सरकारची स्कीम आहे, वाचा अधिक माहिती

Pooja Karande-Kadam

what is post office gram suraksha scheme : गुंतवणूक करणे ही तर आजच्या काळाची गरज बनली आहे. पण गुंतवणूक करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. कारण, यात फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामूळे प्रत्येकालाच सुरक्षित गुंतवणूक करणे जमते असे नाही.

मार्केटमधील जोखिम असलेल्या ठिकाणी पैसे न गुंतवता अशा ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार करा. जिथे पैसे गुंतवल्यावर आपले पैसे चांगल्या परताव्यासोबत रिटर्न मिळण्याची खात्री असते. आणि अशा स्कीममध्ये पैसे गुंतवल्यावर ते बुडण्याची शक्यता नसते.

आज मार्केटमध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या स्कीम आलेल्या आहेत ज्यातून हाय रिटर्न मिळण्याची शक्यता असते. पण गुंतवणूक म्हटली तर रिस्क ही आपणास घ्यावीच लागत असते. तुम्हाला रिक्स नसलेल्या स्कीममधून फायदा मिळवायचा असेल तर हि संपूर्ण बातमी वाचा.

आज आपण ज्या स्कीमबद्दल बोलणार आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी इंडिया पोस्ट हे एक महत्त्वाचे आर्थिक स्त्रोत आहे.

हे ग्रामीण लोकांना पैसे वाचवण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते. देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागाने अनेक जोखीममुक्त बचत योजना सुरू केल्या आहेत.

अशा योजनेतून चांगला परतावा मिळतो. असेच एक धोरण म्हणजे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना पोस्ट ऑफिसने 1995 साली सुरू केली होती.

यामध्ये कोण गुंतवणूक करू शकते

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदाराचे वय 19 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेत, मॅच्युरिटी रक्कम जास्तीत जास्त वयाच्या 80 व्या वर्षी मिळू शकते.

यामध्ये तुम्ही दहा हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. प्लॅनमध्ये, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. ही पॉलिसी आहे जी पाच वर्षांच्या कव्हरेजनंतर विमा पॉलिसीमध्ये बदलली जाऊ शकते.

कसे मिळतील 35 लाख

या योजनेत गुंतवणूकदारांना दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही एका महिन्यात 1500 ची गुंतवणूक कराल. इथे आपणास दररोज फक्त 50 रूपये गुंतवायचे आहे म्हणजेच महिन्याला 1500 रूपये गुंतवुन आपणास मंँच्युरीटीवर 35 लाखापर्यतचा निधी,परतावा प्राप्त करता येणार आहे.

58 वर्षात 33.40 लाख रुपये मिळवण्यासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांच्या परिपक्वतेवर 34.60 लाख रुपये दरमहा केवळ 1411 रुपये द्यावे लागतील.

या योजनेचे फायदे

पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत कर्ज मिळते.

यात आपण आपल्याला पाहिजे तो पाहीजे तसा प्रिमियम सिलेक्ट करू शकतो.

प्रिमियमचा कालावधी तूम्ही निवडू शकता. वार्षिक,मासिक,तीन महिन्याचा म्हणजे त्रैमासिक,सहा महिन्यांचा यात प्रिमियम भरायला आपल्याला तीस दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो.

गुंतवणुकदारांना आपली पाँलिसी तीन वर्ष झाल्यानंतर आपल्या मर्जीनुसार सरेंडर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पोस्टल ग्राम सुरक्षा योजना मध्ये आपणास किमान दहा हजार अणि कमाल दहा लाख इतकी विम्याची रक्कम दिली जाते.

ह्या योजनेत गुंतवणुकदारांना कमी रिस्कसोबत चांगले रिटर्न मिळत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT