SBI Main.jpg 
अर्थविश्व

Home Loan: आता होम लोनही महागणार, SBI ने वाढवले व्याजदर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकने (State Bank of India एसबीआय) गृह कर्जाचे (होम लोन) दर वाढवले आहेत. एसबीआयने किमान व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार आता व्याजदर 6.70 टक्क्यांवरुन वाढून 6.95 टक्के झाला आहे. नवे दर 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. बँकेने किमान व्याजदरात 25 बेसिस पॉईँट किंवा 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. मागील महिन्यात एसबीआयने 31 मार्चपर्यंत एक विशेष ऑफर जाहीर केली होती. यामध्ये होम लोन 6.70 टक्क्यांवर उपलब्ध झाले होते. आता पुन्हा त्यात वाढ केली आहे. त्यामुळे एसबीआयच्या पावलावर पाऊल ठेवत इतर बँकाही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. 

आताही मिळेल थोडीशी सवलत
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, त्यांचे होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (इबीएलआर) पेक्षा 40 बीपीएसच्या वर उपलब्ध आहेत. इबीएलआर जो आरबीआयच्या रेपो रेटशी निगडीत आहे. सध्या तो 6.65 आहे. याचाच अर्थ होम लोन 7 टक्क्यांवर उपलब्ध होईल. जर होम लोनसाठी अर्जदार महिला असेल तर तिला 5 बीपीएस सवलत मिळेल. त्यामुळे व्याजदर 6.95 टक्क्यांवर मिळेल. बँक प्रोसेसिंग फी ही घेईल. जी कर्ज रकमेच्या 0.40 टक्क्यांबरोबर जीएसटीही असेल. किमान 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये जीएसटीच्या अधीन असतील.

31 मार्चपर्यंत प्रोसेसिंग फीवर होती सवलत
दरम्यान, बिल्डर टायअप प्रोजेक्ट्ससाठी वैयक्तिक टीआयआर (टायटर इन्व्हेस्टिंग रिपोर्ट) आणि व्हॅल्यूएशनची गरज नाही. प्रोसेसिंग फी कमाल 10000 रुपये जीएसटीच्या अधीन कर्ज रकमेवर 0.40 टक्के असेल. परंतु, जर टीआयआर आणि व्हॅल्यूएशनची गरज असेल तर सर्वसाधारण शूल्क लागू होईल. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर याचा उल्लेख केला आहे. यापूर्वी एसबीआयने 31 मार्च 2021 पर्यंत होम लोन प्रोसेसिंग फी माफ केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT