३१ ऑगस्टपासून होणार नियमांची अंमलबजावणी
ट्रेडिंगशी संबंधित पॉवर ऑफ अटर्नीच्या नियमांच्या अंमलबजावणीला सेबीने मुदतवाढ दिली आहे. हे नियम आता १ ऑगस्ट २०२० पासून अंमलात आणण्यात येणार आहे. ग्राहकांनी ट्रेडिंग सदस्यांना किंवा क्लिअरिंग सदस्यांना द्यावयाच्या पॉवर ऑफ अटर्नीच्या संदर्भातील हे नियम आहेत. फेब्रुवारी २०२०च्या मार्गदर्शक तत्वात सेबीने प्लेज आणि री-प्लेजसाठी द्यावयाच्या मार्जिनसंदर्भातील निकष स्पष्ट केले आहेत. हे नियम १ जून २०२० पासून लागू होणार होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ग्राहकांकडून ट्रेडिंग मेंबर किंवा क्लिअरिंग मेंबला देण्यात आलेल्या पॉवर ऑफ अटर्नीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी सेबीने हे नियष आणले आहेत. ग्राहकांना प्लेज आणि रि-प्लेजसाठ द्यावयाचे मार्जिन हे डिपॉझिटरी सिस्टमच्या प्लेज आणि रि-प्लेज पद्धतीने देण्याचा निकष सेबीने ठेवला आहे. त्याशिवाय मार्जिनच्या उद्देशासाठी ट्रेडिंग मेंबर किंवा क्लिअरिंग मेंबरच्या डीमॅट खात्यात ग्राहकांच्या शेअरच्या हस्तांतरणाला परवानगी दिली जाणार नाही.
१ जूनपासून ट्रेडिंग मेंबर किंवा क्लिअरिंग मेंबरला ग्राहकाने दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीच्या संदर्भात त्यातील होल्डिंग हे ट्रेडिंग मेंबर किंवा क्लिअरिंग मेंबरने मिळवलेल्या मार्जिनच्या बरोबरीचे समजले जाणार नाही, असे सेबीने सांगितले होते. मात्र कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे स्टॉक ब्रोकर्सचे प्रतिनिधी आणि ब्रोकर संघटनांनी या नव्या नियमांची अंमलबजावणमी करण्यात अडचणी येणार असल्याचे सेबीला कळवले होते. कारण बाजारातील पायाभूत संस्थांमध्ये करण्यात यावयाच्या बदलांची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे १ जूनपासू हे नवे नियम अंमलात आणण्यात अडचणी येणार होत्या.
म्हणूनच सेबीने याला मुदतवाढ दिली आहे. हे नवे नियम आता १ ऑगस्ट २०२० पासून लागू होणार आहेत, अशी माहिती सेबीने दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.