शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अर्थमंत्र्यांना वृद्ध आणि सेवानिवृत्त लोकांच्या आर्थिक समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.
देशाचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. (अर्थसंकल्प Budget 2022) अशा परिस्थितीत देशातील अनेक बड्या कंपन्या, राजकीय पक्षांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण आपली मागणी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर ठेवत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही वृद्ध आणि सेवानिवृत्त लोकांचे आर्थिक समस्या सोडवण्याचे आवाहन करत अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर (FD) विशेष व्याजदर निश्चित करण्याची विनंती केली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिस बचत योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) वरील गुंतवणुकीची मर्यादा काढून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Union Budget Updates on Senior Citizen Interest on FD)
बचत योजनेवर व्याजदर वाढवण्याची मागणी
बचत योजनेवरील कमी व्याजदरामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला निवृत्ती निधी (Retirement Fund) खूपच कमी आहे. यामुळे त्यांच्या खिशावर विशेषत: कोविड-19 काळात मोठा भार पडल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून म्हटले आहे.
महागाई दर लक्षात घेता, व्याज दर अजूनही खूप कमी आहे. अलिकडच्या वर्षांत, एफडीवरील व्याजदर 12% वरून 5% वर आला आहे. याशिवाय, पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याजदर 7% पर्यंत खाली आला आहे, ज्यामध्ये गुंतवणूक मर्यादा 15 लाख रुपये आहे. ही दरी कमी करण्याची मागणी चतुर्वेदी यांनी केली.
पीपीएफच्या बाबतीत, गुंतवणुकीची वार्षिक मर्यादा फक्त 1.5 लाख रुपये आहे. एवढेच नाही तर PPF व्यतिरिक्त इतर कर देखील आकारला जातो. टॅक्स बेनिफिटशिवाय, कमी व्याजदरामुळे, आज ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना त्यांचे घर व्यवस्थित चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी बँक एफडीवर विशेष व्याजदर निश्चित (FD Interest Rates) करावा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.