federal bank of america sakal
अर्थविश्व

Sensex : शेअरबाजारांना हुडहुडी; सेन्सेक्स ६३६ अंश घसरला

अमेरिकी फेडरल बँक बैठकीतील निर्णयाच्या धसक्यामुळे आज पुन्हा जागतिक शेअरबाजारांसह भारतीय शेअर बाजारांनी सुमारे एक टक्का लोळण घेतली.

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकी फेडरल बँक बैठकीतील निर्णयाच्या धसक्यामुळे आज पुन्हा जागतिक शेअरबाजारांसह भारतीय शेअर बाजारांनी सुमारे एक टक्का लोळण घेतली.

मुंबई - अमेरिकी फेडरल बँक बैठकीतील निर्णयाच्या धसक्यामुळे आज पुन्हा जागतिक शेअरबाजारांसह भारतीय शेअर बाजारांनी सुमारे एक टक्का लोळण घेतली. सेन्सेक्स ६३६.७५ अंश घसरून ६१ हजारांच्या खाली आला तर १८९.६० अंश घसरलेला निफ्टी जेमतेम अठरा हजारांच्या वर टिकून राहिला.

अमेरिकी फेडरल बँक व्याजदरवाढ करेल या भीतीने आज बहुतेक आशियाई शेअर बाजार तसेच अमेरिकी शेअर बाजार मोठा तोटा दाखवीत होते. लौकरच येणारा या बैठकीचा तपशील तसेच अमेरिकी उत्पादनाचा तपशील यात नेमके काय असेल या शंकेने सगळीकडेच घबराट पसरलेली होती. त्याचे अनुकरण भारतीय शेअर बाजारांनीही केले व मोठ्या शेअरमध्ये विक्री झाली. सकाळी व्यवहार सुरू होतानाच बाजार तोटा दाखवीत होते व नंतर तो तोटा वाढतच गेला. दिवसअखेर सेन्सेक्स ६०,६५७.४५ अंशावर तर निफ्टी १८,०४२.९५ अंशांवर स्थिरावला.

आज जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. पण त्यातही धातूनिर्मिती आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र सर्वात जास्त म्हणजे दोन टक्के कोलमडली. निफ्टी मधील जे. एस. डब्ल्यू. स्टील व हिंदाल्को या दोन्ही शेअर चे भाव प्रत्येकी चार टक्के कोसळले. तर टाटा स्टीलही अडीच टक्क्यांनी कोसळला. वेदांत तर्फे या वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मधील उत्पादनाचा तपशील कमी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे भविष्याच्या भीतीने या क्षेत्रातील सर्वच शेअरचे भाव कोलमडले. निफ्टी मध्ये डॉक्टर रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, डीव्हीज लॅब या शेअरचे भाव किरकोळ वाढले.

आज सेन्सेक्स मधील प्रमुख ३० पैकी २७ शेअरचे भाव कोसळले तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ४३ शेअरचे भाव पडले. आज एनएसई मधील १,४८२ शेअरचे भाव तोटा दाखवीत होते तर ५५४ शेअर्सचे भाव नफ्यात होते. बीएससी वरील २,३५१ म्हणजेच ६४ टक्के शेअरचे भाव पडले होते तर १,१३६ म्हणजे ३१ टक्के शेअरचे भाव वाढले. केवळ १४० शेअरचे भाव कालच्या इतकेच राहिले होते.

सेन्सेक्स मधील मारुती, अल्ट्राटेक सिमेंट व टीसीएस या शेअर चे भाव किरकोळ वाढले. तर टाटा स्टील, पॉवरग्रीड, टाटा मोटर, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव दोन टक्के कोसळले. एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि इंडसइंडबँक या शेअरचे भाव दीड टक्का कमी झाले. तर आयटीसी, स्टेट बँक, बजाज फिन्सर्व्ह, महिंद्र आणि महिंद्र, नेस्ले, लार्सन टुब्रो या शेअरचे भाव एक टक्का कोसळले.

आज पडझड झाली तरी तळाच्या भावाला म्हणजे अठरा हजारांच्या जवळपास खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. बँका व आयटी क्षेत्राचे निकाल चांगले येण्याची शक्यता असल्याने त्या क्षेत्रांवर सर्वांचे लक्ष राहील. तर अर्थसंकल्प जवळ येत असल्याने विमा, खतनिर्मिती, कृषी आदी शेअरच्या भावातही चढउतार होईल. - सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT