शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा मंत्र म्हणजे 'संयम'.
Multibagger Stock : तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर बाजारात (Share Market) छप्परफाड कमाई करू शकता. कारण सब्र का फल हमेशा मिठा होता है, आपण ऐकलं असेलच. शेअर बाजारात हा सब्र खूप कमाई करून देतो. शेअर बाजारात पैसे कमवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा मंत्र म्हणजे 'संयम'. गेल्या दोन वर्षांत अनेक शेअर्सने मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger stock) यादीत स्थान मिळवले आहे, आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअर बद्दल सांगणार आहोत, ज्याने त्याच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं.
आम्ही बजाज फायनान्स (Bajaj finance) स्टॉकबद्दल बोलत आहोत. बजाज ग्रुपचा हा स्टॉक एनएसईवर (NSE) 11 फेब्रुवारी 2010 रोजी 29.18 रुपयांवर होता. हाच स्टॉक 4 फेब्रुवारी 2022 रोजी 7,148 रुपयांपर्यंत वाढला. सुमारे 12 वर्षांत या शेअरने 24,400 टक्के इतका तगडा परतावा दिला आहे.
बजाज फायनान्सची गगनभरारी
लाइव्ह मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीच्या (NBFC)शेअरवर गेल्या एक महिन्यापासून विक्रीचा दबाव आहे. या कालावधीत हा स्टॉक सुमारे 7,750 रुपयांवरून 7,148 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यात 8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. गेल्या 6 महिन्यांत बजाज फायनान्सचे शेअर्स सुमारे 6,225 रुपयांवरून 7,148 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. या कालावधीत त्यात 15 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या एका वर्षात, बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत सुमारे 5,500 रुपयांवरून 7,148 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत गेल्या 5 वर्षांत 1,090 रुपयांवरून 7,148 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत 575 टक्के वाढ झाली आहे.
किती फायदा ?
बजाज फायनान्सच्या शेअर प्राइस पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी बजाज ग्रुपच्या या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.29 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 6.75 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 12 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक (Investment) केली असती आणि आतापर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे 2.45 कोटी रुपये झाले असते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.