Agrochemicals shares
अर्थविश्व

Agrochemicals: या स्टॉककडून प्रति शेअर 100 रुपये डिव्हिडेंड जाहीर

तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

सकाळ डिजिटल टीम

एग्रोकेमिकल सेक्टरशी संबंधित बायर क्रॉपसायन्स लिमिटेड (Bayer CropScience Limited) या लार्ज कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना भेट देण्याचे निश्चित केले आहे. कंपनी 100 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देणार (interim dividend) आहे.

बायर क्रॉपसायन्स ही बहुराष्ट्रीय कंपनी असून तिचे मार्केट कॅप 21,300 कोटी रुपये आहे. कंपनी हाय-टेक पॉलिमर, कृषी आणि आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये दिग्गज मानली जाते. भारतात, बायरचा प्रमुख विभाग क्रॉप सायन्समध्ये गुंतलेला आहे. शिवाय एन्वारमेंट सायन्स (Environment science), सीड्स आणि क्रॉप प्रोटेक्शनसारख्या क्षेत्रातही कंपनी काम करते.

बुधवारी बायर क्रॉपसायन्सचा शेअर 1.74 टक्क्यांनी वाढून 4,740.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 9% परतावा दिला आहे. पण, 2022 मध्ये हा शेअर सुमारे 4 टक्के आणि एका वर्षात 3 टक्क्यांनी घसरला आहे.

बुधवारी झालेल्या कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या फेस व्हल्यूच्या शेअरवर 100 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केल्याचे बायर क्रॉपसायन्सने एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले. हा अंतरिम लाभांश 8 डिसेंबर 2022 रोजी बँक ट्रान्सफरद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. पात्र भागधारक  (Eligible Shareholders) निश्चित करण्याच्या उद्देशाने, शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीचा नेट सेल्स वार्षिक आधारावर 12.92 टक्क्यांनी घसरून सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 1,451.90 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 1,667.40 कोटी होती. त्याच वेळी, याच कालावधीत कंपनीचा करानंतरचा नफा 40 टक्क्यांनी घटून 229 कोटी रुपयांवर आला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT