Share Market  esakal
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजार तेजीत बंद मात्र 'या' मोठ्या शेअर्समध्ये घसरण

सुरवातीच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह सुरू झाला आणि शेवटच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजारासाठी ऐतिहासिक होता. शेअर मोठ्या अंकाच्या तेजीसह बंद झाला होता. आजही दिवसभर शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं. सुरवातीच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह सुरू झाला आणि शेवटच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

सेन्सेक्स 177 अंकाच्या तेजीसह 62,681 वर बंद झाला तर निफ्टी 55 अंकाच्या तेजीसह 18,618 वर बंद झाला. (Share market closing news update 29 November 2022)

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 62701.4 च्या पातळीवर पोहोचला होता. व्यवहाराच्या शेवटी, तो 211.16 अंकांच्या अर्थात 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 62504.80 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीनेही 18614.25 हा नवा उच्चांक गाठला. शेवटी, तो 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 18562.80 च्या पातळीवर बंद झाला

आज शेअर बाजार बंद झाल्यानंतर 28 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 22 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. KOTAKBANK, TCS, TATAMOTORS, WIPRO सारख्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

जागतिक चिंता असूनही भारतीय बाजारात स्थिर वाढ दिसत असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. भारत यापुढेही इतर बाजारांना मागे टाकत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कंपन्यांच्या मजबूत कामगिरीचा आणि मागणीत वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्था आणि बाजार या दोघांनाही फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT