आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात दिवसभर घसरण होती. अखेर मोठ्या घसरणीसह शेवटच्या सत्रात शेअर बाजार बंद झाला. आज सेन्सेक्स 1056 अंकाच्या घसरणीसह 58,877 वर बंद झाला तर निफ्टी 346 अंकाच्या घसरणीसह 17,530 वर बंद झाला.
आज सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात पडझड कायम होती. शेअर्स मध्ये अप्स अँड डाऊन दिसून आले. अखेर शेअर बाजार बंद होताना तब्बल 48 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर फक्त दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली. CIPLA आणि INDUSINDBK या दोन शेअर्समध्ये तेजी तर विशेषत: आयटी, फार्मा आणि बँकीगचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. आज सेन्सेक्स 233 अंकाच्या घसरणीसह 59,700 वर सुरू झाला तर निफ्टी 96 अंकाच्या घसरणीसह 17,781 वर सुरू झाला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली आणि त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले
2 शेअर्स येत्या काळात देतील तगडा परतावा
किर्लोस्कर फेरस(Kirloskar Ferrous)
बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी तुमच्यासाठी मेटल क्षेत्रातील किर्लोस्कर फेरसची (Kirloskar Ferrous) निवड केली आहे. ही कंपनी पिग आयर्न बनवणाऱ्या किर्लोस्कर ग्रुपची आहे. पिग आयर्नमध्ये कंपनीचा सुमारे 43 टक्के हिस्सा आहे. फेरस कास्टिंग्जमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 21 टक्के आहे.
आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance)
विकास सेठींनी NBFC सेक्टरमधून दुसरा शेअर निवडला, ज्यामध्ये त्यांनी आयआयएफएल फायनान्सची (IIFL Finance) निवड केली आहे. या स्टॉकचे मूल्यांकनही खूप स्वस्त आहे. कंपनी 4 विभागांमध्ये कार्यरत आहे, ज्यात गृह कर्ज, गोल्ड लोन, मायक्रो फायनान्स आणि बिझनेस लोन यांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण आणि निव्वळ एनपीएमध्ये घट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.