Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : सेन्सेक्स-निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद!

आज कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल

शिल्पा गुजर

बुधवारी बाजाराची सुरुवात घसरणीने झाली.

शेअर बाजारात (Share Market) बुधवारी सलग दुस-या दिवशी नफावसुली (profit booking) पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेत आणि क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याने सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स 656.04 अंकांच्या अर्थात 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 60,098.82 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 174.65 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरून 17,938.40 वर बंद झाला.

वाढत्या महागाईमुळे बॉन्ड यील्डमधील वाढ, पश्चिम आशियातील वाढता जियोपॉलिटिकल ताण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे बाजारात घसरण पाहायला मिळाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर, म्हणाले.

निफ्टीने डेली स्केलवर बियारिश कँडल तयार केली आणि गेल्या 8 ट्रेडिंग सत्रातील हायर हाईज फॉर्मेशन नाकारल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 18000 च्या खाली राहील तोपर्यंत त्यात कमजोरी राहील आणि तो 17850 आणि नंतर 17777 पर्यंत जाऊ शकतो. वर 18081 आणि 18200 वर रझिस्टेंस आहे.

आज शेअर बाजाराची स्थिती कशी असेल ?

बुधवारी बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. जागतिक बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. आता निफ्टीला 18,300 वर रझिस्टेंस दिसत आहे. तर खाली, 17700 वर सपोर्ट दिसत आहे. बँक निफ्टीसाठी, 38500 वर रझिस्टेंस आणि 37500 वर सपोर्ट दिसत आहे.

निफ्टी 18000 च्या खाली बंद झाला तर ही बाजारासाठी अतिशय खराब असेल असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. 17960 ची पातळी खूप महत्त्वाची असेल, असेही ते म्हणाले. निफ्टीने ही पातळी ओलांडली तर आपण 18,000-18,050 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 17900 च्या खाली घसरला तर 17,850-17,820 च्या पातळीला जाईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स

- इन्फोसिस (INFOSYS)

-श्रीसेम (SHREECEM)

- एशियन पेंटस (ASIANPAINT)

- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

- हिन्दुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

- टाटा पॉवर (TATA POWER)

- हिन्दुस्थान एअरोनोटिक्स (HAL)

- गुजरात गॅस लिमिटेड ( GUJGASLTD)

- बाटा इंडिया (BATAINDIA)

- कॅनरा बँक (CANBK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT